आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Newly Appointed Governor C. Vidhyasagar Rao At Mumbai, CM Prithviraj Chavan Welcomed Him

PHOTOS: विद्यासागर राव यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- राज्याचे नवनियुक्त राज्यपाल विद्यासागर राव यांना शपथ देताना मुख्य न्यायाधिश मोहित शहा. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नितीन गडकरी, अजित पवार उपस्थित होते)
मुंबई- तेलंगणातील भाजपचे ज्येष्ठ नेते विद्यासागर राव यांनी आज सायंकाळी चार वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी राव यांना शपथ दिली.
मागील आठवड्यात राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे प्रभारीपद दिले होते. त्यानंतर बुधवारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून विद्यासागर राव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आज मुंबईत राजभवन येथे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी राव यांनी राज्यपालपदाची शपथ दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासह काही मंत्री व अनेक मान्यवर उपस्थित होते.
राव यांचे शुक्रवारी मुंबईत सपत्निक आगमन झाले. राव विमानतळावर येताच मुख्यमंत्री चव्हाण यांनी राव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यासमवेत मंत्री सुरेश शेट्टी, विनोद तावडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा मुख्यमंत्री चव्हाणांनी राव यांचे स्वागत करताना व संवाद साधतानाचे क्षण...