आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेच्या तुकड्यांसाठी असंगाशी संग करू नका- शिवसेनेने भाजपला पुन्हा सुनावले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्धव ठाकरे (फाईल फोटो) - Divya Marathi
उद्धव ठाकरे (फाईल फोटो)
मुंबई- गोंदियात काँग्रेस-भाजप एकत्र आले यामध्ये काय (काळा)कांडी आहे? ही नायटेगिरी निर्मळ पाणी गढूळ करणारी आहे. ज्यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर लढायचे, वस्त्रहरण करायचे त्याच वस्त्रहरणातील चिंधी उपरणे म्हणून खांद्यावर टाकून मिरवायचे. यामुळे तात्पुरते सुख मिळाले असले तरी या सुखाचे काटे भविष्यात टोचतील. सत्तेच्या तुकड्यांसाठी असंगाशी संग करून उगाच ‘बाटवा बाटवीत’ पडू नका व दुसर्‍यांचा नायटा आपल्या अंगावर घेऊन लोकांच्या संतापाचे धनी बनू नका. संघाने तुम्हाला हेच संस्कार व संस्कृती शिकवली काय? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे.
मागील आठवड्यात गोंदिया-भंडारा येथे झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुमत मिळवले होते. मात्र, तेथील स्थानिक काँग्रेस आमदार व राष्ट्रवादीत सख्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादीस सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी व जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. नेमका हाच मुद्दा उपस्थित करून शिवसेनेने भाजपला झोडण्याची संधी सोडली नाही. सामनामध्ये अग्रलेख लिहून उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचे ढोल बडवणा-या भाजपला संस्कार व संस्कृतीची आठवण करून देत फटकारले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, राजकारणात कोण कुणाच्या गळ्यात गळा घालेल ते सांगता येत नाही व कोण कुणाची तंगडी ओढेल त्याचा भरवसा नाही. पंचवीस वर्षांचे मित्र दुश्मन होतात तर जन्मापासूनचे वैरी अचानक मित्र बनतात. हा सर्व चमत्कार सत्ता व मत्तेचा आहे. या चमत्काराची कांडी विदर्भ भूमीत गोंदिया जिल्ह्यात फिरली असून या कांडीने अनेकांची डोकी गरगरली आहेत. गोंदियात भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसला पवित्र करून जी मिठी मारली आहे त्यामुळे सगळेच अचंबित झाले आहेत. भारतीय जनता पक्ष हा अत्यंत निर्मळ, पवित्र व स्वच्छ मनाचा पक्ष आहे व त्यांच्यावर संघाचे संस्कार असल्याने त्यांच्या हेतूबाबत कोणी शंका घेण्याचे कारण नाही. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आला आहे व विधानसभेत कॉंग्रेसने भाजप मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे व अनागोंदीचे आरोप केले. त्यामुळे कॉंग्रेसने भ्रष्टाचारास मिठी मारली की भाजपने कालच्या भ्रष्टाचार्‍यांना पवित्र करून सोयरिक जमवली हे कळायला मार्ग नाही. म्हणजे भाजपला कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचारी वाटला नाही आणि कॉंग्रेसलाही भाजप जातीयवादी असल्याचा विसर पडला. हादेखील एक चमत्कारच आहे. अर्थात असा निर्णय घ्यायला हिंमत व धाडस लागते. ती हिंमत आपल्यात असल्याचे आमच्या मित्रवर्यांनी दाखवून दिले, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला शालजोडे हाणले आहेत.
पुढे आणखी वाचा, उद्धव ठाकरेंनी भाजपला कशा शब्दात फटकारले आहे....
बातम्या आणखी आहेत...