आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 दिवसापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची ठाण्यात भर रस्त्यात भोकसून हत्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आठ दिवसापूर्वीच लग्न झालेल्या आणि माहेरी परीक्षा देण्यासाठी आलेल्या नवविवाहितेची दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी चाकूने भोकसून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील जुना पासपोर्ट ऑफिस परिसरात घडली. भररस्त्यात बुधवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला तर हल्लेखोर फरार झाले आहेत. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्रियंका प्रमोद खराडे (24) असे या मृत तरूणीचे नाव आहे. प्रियंका ठाण्यातील किसननगरमध्ये राहते. प्रियकांचे 28 एप्रिल रोजीच कल्याण येथील प्रमोद खराडे याच्यासोबत लग्न झाले होते. प्रियंका ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजची विद्यार्थिनी असून, तिचे अजूनही शिक्षण सुरु होते. प्रियंका सासरहून मंगळवारीच घरी आली होती. ती बुधवारी सकाळी कॉलेजमध्ये जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती.
दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास ती जुना पासपोर्ट ऑफिस मागील रस्त्यावरून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिचा रस्ता आडवला. त्याच दरम्यान दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने धारदार चाकूने प्रियंकाच्या गळ्यावर सपासप वार केले. प्रियंका जागेवरच कोसळली व जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर मात्र लागलीच दुचाकीवरून फरार झाले.
दुचाकीस्वरांनी तोंडाला स्कॉर्प बांधल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. मात्र, दुस-या एका ठिकाणी प्रियंकासोबत एक तरूण बोलत चालल्याचे दिसून येत आहे. त्याचा शोध व ओळख पटली की घटनेचा तपास लागेल असे ठाणे पोलिसांचे म्हणणे आहे. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.