आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाेरीबंदर ते ठाणे रेल्वेचा 164 वा वाढदिवस उत्साहात, १६ एप्रिल १८५३ राेजी धावली होती पहिली रेल्वे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावेळी रेल्वेसारखा दिसणारा केक कापण्यात आला. - Divya Marathi
यावेळी रेल्वेसारखा दिसणारा केक कापण्यात आला.
मुंबई - ‘सायबाचा पोर लई अकली, बिनबैलाची गाडी कशी धकली’ अशी प्रतिक्रिया ज्या गाडीबद्दल व्यक्त केली होती, त्या मुंबई ते ठाणे ऐतिहासिक रेल्वेला रविवारी १६४ वर्षे पूर्ण झाली. १६ एप्रिल १८५३ राेजी बाेरीबंदर ते ठाणे यादरम्यान अाशिया खंडातील पहिली रेल्वे धावली. या एेतिहासिक घटनेच्या स्मृती जागवण्यासाठी प्रवासी संघटनांतर्फे ठाणे स्थानकात रविवारी छाेटेखानी समारंभ झाला. रेल्वेची प्रतिकृती असलेला पाच किलाेचा केक कापून प्रवाशांनी या रेल्वेचा १६४ वा वाढदिवस जल्लाेषात साजरा केला.
 
पहिली रेल्वेगाडी ठाणे स्थानकातून सुरू झाली. त्यामुळे या स्थानकाला ऐतिहासिक दर्जा मिळाला आहे. त्यामुळे पहिल्या रेल्वेचे वाफेचे इंजिन या स्थानकात आठवण म्हणून ठेवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून वर्षभरात त्याची पूर्तता करू, असे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.   
 
पहिल्या फेरीत ४०० प्रवासी  
भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर - ठाणे अशी ३३ किलोमीटर मार्गावर धावली होती.  पहिल्या फेरीत ४०० प्रवाशांनी प्रवास केल्याची नाेंद रेल्वेकडे अाहे. त्या वेळी दिवसातून दोन ते तीन फेऱ्या होणारी उपनगरीय लोकल सेवा आज तब्बल ११०० पेक्षा जास्त  लोकल फेऱ्यांचा भार उचलत आहे. प्रवाशांची संख्या आता तब्बल सात लाखांवर गेली अाहे.

पहिल्या रेल्वेची प्रतिकृती   
रेल्वेचा १६४ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ठाणे स्थानकावर सजावट करण्यात अाली हाेती. १८५३ मध्ये धावलेल्या पहिल्या गाडीच्या मूळ छायाचित्राबराेबरच वाफेचे इंजिन अाणि चार डबे असलेल्या गाडीची प्रतिकृती बनवण्यात अाली हाेती.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...