आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात स्वाइन फ्लूचे 171 बळी, मुंबईत स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - स्वाइन फ्लूच्या आजाराने राज्यात पुन्हा एकदा डोके वर काढले अाहे.  आतापर्यंत  या आजाराने महाराष्ट्रात १७१ जणांचा बळी गेला आहे.  मुंबईत स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई,  कोकण विभागात स्वाइन फ्लूच्या आजाराचा फारसा प्रादुर्भाव नसला तरी पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर भागात मात्र या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे अाराेग्य विभागाने स्पष्ट केले अाहे.  
 
 जानेवारी ते एप्रिल या  चार महिन्यांत मुंबईत स्वाइन फ्लूचे २१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत स्वाइन फ्लूचा ताप वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  स्वाइन फ्लूमुळे मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक-एक बळी गेला आहे. मुंबई आणि कोकणात या आजाराचा जास्त प्रादुर्भाव नसला तरी  पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण जास्त अाहे, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.  राज्यात स्वाइन फ्लूचे  एकूण ८६३ रुग्ण असून यापैकी  ५६२ रुग्णांवर उपचार करून ते घरी गेलेले आहेत. १३२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले. स्वाइन फ्लू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी  राज्यातील शासकीय रुग्णालयात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात या आजाराचे वेगाने सर्वेक्षण करण्यात येत आहे. आजाराचा प्रादुर्भाव वाढलेल्या विभागात कार्यशाळा घेऊन लोकांमध्ये जागृती  करण्यात येत  असल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले. वेळेवर उपचार गरजेचा  : स्वाइन फ्लूवर गुणकारी असलेल्या ऑसेलटॅमीवीर या औषधाचा साठा  पुरेशा प्रमाणात आहे. हे औषध  रुग्णाला वेळेत सुरू होणे गरजेचे आहे. 
बातम्या आणखी आहेत...