आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये 200 विंटेज कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विविध प्रयोगांसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यपने एक नव्हे, दोन नव्हे, तर चक्क 200 विंटेज कारचा वापर केला आहे. चित्रपटाचा काळ 50 ते 70च्या दशकातील व मुंबईकेंद्रित आशय असल्याने अनुरागने एवढ्या मोठ्या प्रमाणात या कार चित्रीकरणासाठी वापरल्या आहेत. आतापर्यंतचा अनुरागचा हा आपल्या कारकीर्दीतील सर्वात महागडे बजेट असलेला चित्रपट ठरणार आहे.

‘लेह’ चित्रपट महोत्सवात नुकताच अनुराग यांचा ‘अगली’ हा चित्रपट दाखवण्यात आला होता. या चित्रपटाचे कौतुक महोत्सवातून पदरात पाडून घेतल्याबरोबर अनुराग या चित्रपटाच्या देशभरातील प्रदर्शनाबरोबर ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात रणवीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातून पडद्यावर प्रथमच तेही नकारात्मक भूमिका करणारा निर्माता करण जोहर याने या चित्रपटासाठी निव्वळ 11 रुपयांचा चेक घेऊन भूमिका स्वीकारली आहे. तसेच रवीना टंडन, के. के. मेनन, संदेश जाधव अशीही स्टारकास्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण श्रीलंकेत झाले आहे. लेखक ज्ञान प्रकाश यांच्या ‘मुंबई फेबल्स’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून श्रीलंकेतूनच 200 विंटेज कारचा कादंबरीतील काळ चित्रपटात जसाच्या तसा उभा करण्यासाठी पुरवठा या चित्रपटासाठी झाला आहे. ब्रिटिश काळातील कथानक या चित्रपटात आहे. मोहित चौहान या चित्रपटाची संगीताची बाजू सांभाळत आहे. येत्या 28 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.