आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६/११ मुंबई हल्ल्यात डेव्हिड हेडली सहआरोपी, विशेष न्यायालयाची मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईवरील२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात डेव्हिड कोलमन हेडलीला सहआरोपी करण्याबाबतची मुंबई पोलिसांची विनंती विशेष न्यायालयाने मान्य केली आहे. हेडलीने २६/११ च्या हल्ल्याच्या पूर्वतयारीत महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा मुंबई पोलिसांचा दावा आहे. विशेष म्हणजे हेडलीनेच अमेरिकेतील न्यायालयात आपण मुंबई हल्ल्यापूर्वी रेकी केल्याची कबुली दिली होती.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा खटला सध्या विशेष न्यायालयात सुरू आहे. या हल्ल्याच्या कटात सईद जबिउद्दीन अन्सारी ऊर्फअबू जुंदालच्या बरोबरीने हेडलीचाही सहभाग होता. त्यामुळे त्यालादेखील सहआरोपी करावे, अशी विनंती मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरला न्या. सानप यांच्यासमोर केली होती. याबाबत विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम म्हणाले की, या हल्ल्याच्या कटात हेडलीचा सक्रिय सहभाग होता. हल्ल्याच्या ठिकाणांचे नकाशे आणि छायाचित्रे काढून हेडलीने ती हल्लेखोरांना दिली होती. त्यामुळे हेडलीला सहआरोपी करण्याची आम्ही केलेली न्या. सानप यांनी मान्य केली असून आता हा खटला दोघांवरही एकत्रितपणे चालवण्यात येईल. १० डिसेंबर रोजी हेडलीला कोर्टात हजर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही अॅड. निकम म्हणाले.
इलिनॉईस जिल्हा न्यायालयाला करणार विनंती :
पाकिस्तान आणि अमेरीका असे दुहेरी नागरीकत्व असलेला डेव्हिड हेडली हा लष्कर तोयबाचा सदस्य अाहे. तो सध्या अमेरिकेत असून त्याला विविध दहशतवादी कारवायांसाठी ३५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे हेडलीला व्हिडीअो कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात यावे यासाठी अमेरिकेतील इलिनॉईस जिल्हा न्यायालयाला विनंती केली जाणार आहे. अमेरिकेत हेडलीला ज्या आरोपांखाली शिक्षा झाली आहे, त्यापेक्षा वेगळ्या आरोपांखाली त्याच्यावर मुंबईत खटला सुरू असल्याची बाबही अमेरिकी न्यायालयाला पाठवण्यात येणाऱ्या या विनंती पत्रात नमूद करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई पोलीसांच्या वतीने देण्यात आली. या प्रकरणी येत्या १० डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...