आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील २८ सिंचन प्रकल्पांसाठी भरीव निधी देऊ : नितीन गडकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - केंद्रीय मदतीतून होणाऱ्या राज्यातील सिंचन २८ प्रकल्पांना भरीव निधी िमळण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यात मुंबईत केंद्र व राज्यातील संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून हे प्रकल्प मार्गी लागल्यास राज्यातील सिंचनात २५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणता येईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात बोलताना केला.

नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित मिट द प्रेस कार्यक्रमात गडकरी यांनी मागील दोन वर्षांतील कार्याचा व भविष्यातील योजनांचा आढावा जाहीर केला. गडकरी म्हणाले, केंद्र सरकारने प्रथमच एआयबीपी अंतर्गतच्या सिंचन प्रकल्पांसाठी ८० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. देशातील ८९ प्रकल्पांपैकी २८ प्रकल्प केवळ महाराष्ट्रातील असून राज्यातील सर्व प्रकल्पांना भरीव निधी उपलब्ध व्हावा, असे प्रयत्न आहेत. हे प्रकल्प मार्गी लागल्यास राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल, असेही ते म्हणाले. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५ हजार ६६० किलोमीटर एवढीच होती. ती आतापर्यंत २१ हजार ५५९ किमी एवढी करण्यात यश आले आहे. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून ५९ हजार २४९ कोटींची कामे राज्यात मंजूर करण्यात अाली.
अपघात नियंत्रणाचे प्रयत्न
देशातील अपघाती मृत्यूंचे प्रचंड प्रमाण लक्षात घेता ते येत्या काही वर्षात ५० टक्क्यांवर आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या वतीने अपघात निवारण योजना हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील अपघातप्रवण स्थळांचे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार असून त्या स्थळांवर अपघात निवारण उपाययोजना केल्या जाणार आहेत. नागपूर शहर अपघातमुक्त शहर करण्याच्या दृष्टीने योजना हाती घेण्यात आली असून अभ्यासही पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भावर गडकरींनी बाळगले मौन
वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना गडकरी यांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर मौन पत्करले. मी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली असल्याने आता काहीही बोलणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.