आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजल रसिकांच्या ह्रदयसिंहासनावर विराजमान म्हणत भीमराव पांचाळेंनी नाकारले संमेलनाचे निमंत्रण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील 'गझल कट्टा' हा गझलचा उचित सन्मान नसल्याची खंत गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली आहे. divyamarathi.com सोबत बोलताना पांचाळे यांनी गझल रसिकांच्या ह्रद्यात राहाते तिला कोणाच्याही मानाच्या स्थानाची गरज नसल्याचे म्हटले आहे. 90 वर्षांच्या साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच गझल सादर होणार असल्याचे संयोजकांनी म्हटले होते. मात्र निमंत्रण पत्रिकेत त्याचा कुठेही ठळक उल्लेख नाही. 
 
गझलनवाज भीमराव पांचाळे यांना डोंबिवली साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले गेले होते. या निमंत्रणाची खूप गंमत वाटत असल्याचे पत्र त्यांनी 1 फेब्रुवारी रोजी संयोजकांना पाठवले होते. 
मराठीमध्ये गजल रुजविणाऱ्या कविवर्य सुरेश भटांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाने कायम दूर ठेवले होते. एवढेच नाही तर 'मराठी कवितेवर गजलचे आक्रमण' असे बोलही गजलला ऐकावे लागले होते.  
प्रस्थापित साहित्यिकांनी कधीही गजलला जवळ केलेले नव्हते आणि नाही, असे सांगत पांचाळे म्हणाले, 'संयोजकांचे गजल प्रेम हे आव आणणारे आहे. त्यांना खरोखर आत्मीयता असती तर मुख्य व्यासपीठावर गजलचा कार्यक्रम आयोजित केला असता.'
गजल कट्टा हा कार्यक्रम म्हणजे कोणीही यावे आणि आपल्या रचना सादर कराव्या असे आहे. खचितच हे गजलला मानाचे स्थान नाही. 
कोणाबद्दलही राग नसल्याचे सांगत पांचाळे म्हणाले, 'गजल रसिकांच्या ह्रद्यसिंहासनावर विराजमान आहे.'
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोण आहेत भीमराव पांचाळे?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...