आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारस्वतांची मांदियाळी: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी, खास सेल्फी पार्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पस्तीस फुटांची भव्य लेखणी, नामवंत साहित्यिकांच्या मूर्ती, साहित्य पार्क अशा नानाविविध संकल्पना घेऊन तीन फेब्रुवारीपासून डाेंबिवलीत सुरु हाेत असलेल्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी पु. भा. भावे नगरी सजली अाहे. संमेलनातील चर्चा- परिसंवादाचा अास्वाद घेण्याबराेबरच साहित्य विश्वात खऱ्या अर्थाने रममाण हाेण्याची खरी संधी या नगरीत साहित्य रसिकांना मिळणार अाहे. 
  
पु. भा. भावे नगरीत सर्वप्रथम  लक्ष वेधून घेतात ती  भिंतीवर रंगवलेली   ग्रामीण कलेचे प्रतीक असलेली मानवी साखळीची वारली चित्रे. दाेन्ही बाजूंना एकावर एक रचलेल्या पुस्तकांनी तयार केलेले प्रवेशद्वार चटकन डाेळ्यात भरते अाणि येथूनच अापण साहित्य विश्वात कधी येऊन पाेहोचलाे ते कळत नाही. अातमध्ये अाल्यावर समाेरच गणपती, ज्ञानेश्वर अाणि तुकाराम यांचे सुबक मंदिर लक्ष वेधून घेते. या मंदिरापासून पुढे जाताना प्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या साहित्यनगरीतील प्रत्येक गाेष्टी मनाला भावतात.

सेल्फीची अावड असलेल्यांसाठी खास सेल्फी पार्क तयार करण्यात अाला अाहे. या पार्कमध्ये साहित्याचे प्रतिक असलेली ३५ फुटांची लेखणी लक्ष वेधून घेते. साेनरी रंगाची नीब असलेली ही लेखणी म्हणजे एक मनाेरा असून या मनाेऱ्याच्या पहिल्या मजल्यापर्यंत साहित्य रसिक जाऊन फेरी मारू शकतात. या पेनच्या भोवती तयार करण्यात अालेल्या अनाेख्या साहित्य पार्कमध्ये पु. ल. देशपांडे,  अाचार्य अत्रे, शांता शेळके, बहिणाबाई चाैधरी, शं. ना. नवरे यांच्या प्रतिमा ठेवण्यात अाल्या अाहेत.

साहित्य संमेलनात डाेम पद्धतीच्या मंडपाची उभारणी करण्यात अाली असून त्यासाठी ८८ लाेखंडी खांबांचा अाधार देण्यात अाला अाहे. या मंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे छतावर पत्रे अाणि त्यावर तापडपत्रीचे आच्छादन केले अाहे. अातल्या बाजूने पांढरा कपडा लावण्यात अाला अाहे. एखाद्या महालासारख्या दिसणाऱ्या या २५० फूट बाय ४०० फूट मुख्य मंडपातील छताखाली बसणाऱ्या रसिकांना  उष्णतेचा त्रास हाेणार नाही याची काळजी घेण्यात अाली अाहे.  १२  हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी अासन व्यवस्था अाहे. ग्रंथ दालनासाठी ५०० बाय २५० फूट मंडप उभारण्यात अाला अाहे. जवळपास ३५० स्टाॅल या दालनात असतील. त्याचप्रमाणे दाेन कवी कट्टे असल्याने त्यांच्यासाठीही दाेन स्वतंत्र मंडप उभारले अाहेत.
   
मुख्य रंगमच नव्हे, पुस्तकांचा खण   
मान्यवर साहित्यिकांना सहजपणे वावरता यावे यासाठी तब्बल ८० बाय ६० फूट अाकाराचा मुख्य रंगमंच उभारण्यात अाला अाहे. हा रंगमंच म्हणजे एक प्रकारे पुस्तकांचा खण असून त्याच्या एका बाजूला पुस्तके असून मधल्या कप्प्यात एलईडी स्क्रीन बसवण्यात अाला अाहे. रंगमंचाच्या मागे उघडलेली पुस्तकाची पाने असून त्यावर महाराष्ट्रातील गाजलेल्या पुस्तकांची नावे बाेधचिन्हे काेरण्यात अाली अाहेत. दुसऱ्या बाजूला श्री शारदेची मूर्ती विराजमान झालेली बघायला मिळते. मान्यवरांना बाेलण्यासाठी पुस्तकरूपी पाेडियम तयार करण्यात अाले अाहे.   
 
अशी असेल साहित्य नगरी
> सेल्फीची आवड असलेल्यांसाठी खास सेल्फी पार्क तयार करण्यात आला आहे. 
> सेल्फी पार्कमध्ये ३५ फूटाची लेखणी लक्ष वेधून घेते. ही लेखणी म्हणजे एक मनोरा असून त्याच्या पहिल्या मजल्यापर्यंत शिडीने जाऊन साहित्य रसिक फेरी मारू शकतात. 
> साहित्य पार्कमध्ये पू.ल. देशपांडे, आचार्य अत्रे, शांता शेळके, बहिणाबाई चौधरी, शं.ना. नवरे यांच्या मूर्त्या आहेत. 
> पार्कमध्ये फेरफटका मारताना रसिकांना या साहित्यिकांबरोबर सेल्फी काढता येऊ शकेल. 
> साहित्य संमेलनात डोम पद्धतीच्या मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. 
> २५० फूट बाय ४०० फूट आकाराच्या मुख्य मंडपात बारा हजार साहित्य प्रेमी बसतील अशी व्यवस्था आहे. 
> ग्रंथ दालनात ३५० स्टॉल  असतील. दोन कवी कट्ट्यांसाठी दोन मंडप आहेत. 
> साहित्य या संकल्पनेवर आधारीत उभारण्यात आलेला भव्य दिव्य सेट हे यंदाचे खास आकर्षण आहे. 
 
पुढील स्लाइडवर पहा भव्य दिव्य सेट...   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...