आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना कार्ड, ना कॅश.. हे अॅप बदलेल पैसा खर्च करण्याची तुमची पद्धत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आता तुम्हाला मित्र किंवा नातेवाइकाला पैसे पाठवण्यासाठी आणि मागवण्यासाठी बँक अकाउंट डिटेल किंवा कार्डची गरज भासणार नाही. फक्त तुमच्याकडे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे यूपीआय आयडी असणे आवश्यक आहे. पैशांच्या देवाणघेवाणीशिवाय तुम्ही याच्या मदतीने भविष्यात आवश्यक बिले भरणे, ऑनलाइन शॉपिंग ही कामेही करू शकाल. यूपीआयद्वारे तुमची ही सर्व कामे सोपी होतील. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय) सुरू केलेली यूपीआय यंत्रणा जगातील अशा प्रकारची पहिलीच कॅशलेस ट्रान्झॅक्शन सिस्टिम आहे.
एनपीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप अस्बे यांनी ‘भास्कर’ला सांगितले की, यूपीआय आयएमपीएसचीच (आतापर्यंत पेमेंट करण्याची सर्वात वेगवान पद्धत) दुसरी आवृत्ती आहे. सध्या ते ‘पर्सन टू पर्सन’ लाँच केले आहे. पुढील दोन-तीन आठवड्यांत ते ई-मर्चंट्ससाठीही (ऑनलाइन दुकानदार) लाँच केले जाईल. त्यानंतर मोबाइल टॉप अप, टेलिकॉम बिल, ई-कॉमर्स कंपन्यांचे पेमेंट आणि उर्वरितलाइफ मॅनेजमेंट

असे बदलेल तुमचे जीवन
-पैसेहस्तांतरित करण्यासाठी खाते क्रमांक, आयएफएससी कोड, शाखेचे डिटेल यापैकी काहीही लागणार नाही. ई-मेलप्रमाणे एका आयडीद्वारेच रक्कम हस्तांतरित होते.
-शॉपिंगमध्ये जर मर्चंट यूपीआय युजर आहे तर सामानाच्या बदल्यात कॅश किंवा कार्ड देण्याची गरज नाही. ते तुमच्या आयडीद्वारे पेमेंट घेईल. तुम्हाला फक्त अॅपने ओके करावे लागेल.
-डिजिटल व्यवहार होणार असल्याने पैशांच्या चोरीची शक्यता कमी होते. त्याचबरोबर याद्वारे तुम्ही बँकेच्या सुटीच्या दिवशीही व्यवहार करू शकता.
-दुकानदार, शाळा, दूरसंचार कंपन्या अादी जसजसे पेमेंट घेण्यासाठी यूपीआयचा वापर करू लागतील, तसा आपल्याला रोख पेमेंट, कार्डने पेमेंट करावे लागणार नाही. व्याप्ती वाढेल.
-त्यामुळे वेळही वाचेल. कारण त्याद्वारे पैसे ट्रान्सफर करणे नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी १० पट कमी वेळ घेते. पेमेंटही लवकर होते.

यूपीआय म्हणजे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस असे अॅप्लिकेशन आहे, ज्याद्वारे ग्राहक सहजपणे पैशांची देवाणघेवाण करू शकतात. तुम्ही फक्त एका क्लिकच्या माध्यमातून व्यवहार कराल. सध्या नेट बॅँकिंगही केले तर तुम्हाला लॉगइन करण्यापासून व्यवहाराचा पासवर्ड टाकावा तसेच लक्षात ठेवावा लागतो. त्यात आयडी बनवल्यानंतर एका क्लिकवर काम होईल.
बातम्या आणखी आहेत...