आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजांनी दानवेंच्या संस्थेला दिले पोषण आहाराचे कंत्राट, प्रीतींचा सवाल- आर.डी कोण?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपच्या प्रीती मेनन-शर्मा यांनी पंकजा मुंडेवर घोटाळ्याचे आरोप केले. - Divya Marathi
आपच्या प्रीती मेनन-शर्मा यांनी पंकजा मुंडेवर घोटाळ्याचे आरोप केले.
मुंबई - पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बालविकास विभागाने २०१६ मध्ये अंगणवाड्यांसाठी दिलेल्या ४५३९ कोटींच्या पोषण आहाराची १७ कंत्राटे बेकायदा होती. काळ्या यादीतील तीन संस्थांना ४८०५ कोटींची कंत्राटे देण्यात आली. यातील ६३३ कोटींची बेकायदा १५ संस्थांना दिल्याचा गंभीर आरोप आपच्या प्रीती मेनन-शर्मा यांनी मंगळवारी केला. ज्या संस्थांना पोषण आहाराची कंत्राटे मिळाली त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीसुद्धा संस्था असल्याचे मेनन यांचे म्हणणे अाहे. याप्रकरणी पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणीही आम आदमी पक्षाने केली आहे.

एकात्मिक बालविकास सेवा (आयसीडीएस) योजनेंतर्गत लागणारा पोषण अाहार ठेकेदारांकडून न घेता महिला बचत गटांकडून घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, या आदेशाला हरताळ फासत पंकजा मुंडे यांनी खाजगी ठेकेदारांना कंत्राटे दिल्याचे मेनन यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने मागच्या वर्षी दिलेल्या ७७७ कोटी रुपयांच्या आहार कंत्राटांमध्ये ८८ टक्के रकमेची कंत्राटे फसवणुकीचे आरोप असलेल्या संस्थांना दिल्याचे मेमन यांचे म्हणणे आहे.  ज्या संस्थांना कंत्राटे दिली त्या महिला मंडळातील उद्योजकांची नावे पुरुषांची होती. मंडळाच्या सर्व अधिकृत व्यक्ती पुरुष होत्या. आहाराचा दर्जासुद्धा निकृष्ट होता. धक्कादायक बाब म्हणजे दोन पुरवठादारांच्या कुटुंबीयांवर तर सीबीआय व अँटी करप्शन ब्युरोने घोटाळ्याचे गुन्हे नोंदवल्याचे मेनन यांनी सांगितले.  २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने वाभाडे काढल्यावर आघाडी सरकारने चूक सुधारली. ३७५ महिला मंडळांना अंगणवाड्यासाठी आहार पुरवठ्याची कंत्राटे दिली. मात्र पंकजा यांनी २०१७ मध्ये जाचक अटी लादून ३७५ महिला मंडळांना कंत्राटाच्या प्रकियेतून डावलून बेकायदा संस्थांना कंत्राटे दिल्याचे मेनन यांनी सांगितले.  
 
आर. डी. दानवे कोण? : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहायक अतुल वझरकर हे मोरेश्वर या कंत्राट मिळालेल्या संस्थेमधील अधिकृत व्यक्ती आहेत. मोरेश्वरने आपल्या खात्यातून ५ लाख रुपयांचा एक व्यवहार केला आहे. तो आर. डी. दानवे यांच्या नावाने झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दादाराव दानवे हे आर. डी. दानवे आहेत का? याची चौकशी करण्याची मागणी मेनन यांनी केली.
 
पुढील स्लाइडवर वाचा, शिळ्या कढीला ऊत...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...