आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूटरवरून पडून पंकजांना डोक्याला दुखापत, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्कूटरचा सराव करताना पाय घसरून पडल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना शुक्रवारी किरकोळ दुखापत झाली आहे. पंकजा शुक्रवारी सायंकाळी सरकारी निवासस्थानी मुलगा आर्यमानसोबत स्कूटरवर सराव करत होत्या. पाय घसरल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला मार लागून थोडासा रक्तस्राव झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता चांगली असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना काही चाचण्या करायला सांगितल्या असून विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांच्या शनिवारच्या बैठका रद्द करण्यात अाल्या.