आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्ती विकून अमेरिकेत स्थायिक हाेणार हाेते अाेम पुरी, आपल्या वक्तव्याबद्दल खंत वाटत होती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवंगत अभिनेते ओम पुरी शेवटच्या दिवसांत निराश होते. संपत्ती विकून ते अमेरिकेत स्थायिक  होण्याची तयारी करत होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयाने दिली.   
सूत्रानुसार, ओम पुरी यांनी निकटवर्तीयाकडून देशातील संपत्तीचे मूल्यांकन केले होते. रविवारी पोलिसांनी संबंधित व्यक्तीची कसून चौकशी केली. 

पुरी फ्लाेरिडा येथे स्थायिक होण्याची तयारी करत होते, असे त्याने सांगितले. तसेच पोलिसांनी निर्माता खालिद किडवई याची रविवारी चौकशी केली. याशिवाय पुरी यांची मोलकरीण आणि आणखी एका व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली. पुरी यांच्या पत्नी नंदिता यांना चौकशीला बोलावण्यात आले होते, मात्र त्या हजर झाल्या नाहीत. सोमवारी नंदिता पुरी चौथ्या दिवसाचा विधी आटोपून पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता आहे.  
 
उरी हल्ल्याच्या वक्तव्याबद्दल खंत  
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर ओम पुरी यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला. त्यानंतर पुरी यांना आपल्या वक्तव्याबद्दल खंत वाटत होती. याबाबत त्यांनी आपल्या मित्रांजवळ मनही मोकळे केले होते. “लोकांना लष्करात भरती होण्यासाठी कुणीही आग्रह करत नाही,’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. 