आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाश आंबेडकरांवर मध्य प्रदेशात हल्ल्याचा प्रयत्न, भाजपच्या कार्यकर्त्यांवर अाराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर मध्य प्रदेशातील महू येथे भाजप कार्यकर्त्यांकडून बुधवारी (५ जुलै) हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घटनेची माहिती समजताच समाजमाध्यमांवर रविवारी निषेध व्यक्त होत आहे.   
 
जनवेदना किसान संमेलनाच्या कार्यक्रमासाठी आंबेडकर महू येथे गेले हाेते. त्यानंतर महू येथील विज्ञान विद्यापीठात त्यांच्या हस्ते गौतम बुद्ध आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे अनावर करण्यात आले. तो कार्यक्रम संपवून आंबेडकर बाहेर पडले. त्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना काळे झेंडेही दाखवले.  आंबेडकर यांच्यासोबत या वेळी काँग्रेसचे महासचिव मोहन प्रकाश आणि मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव होते. यासंदर्भात भारिप कार्यालयाशी संपर्क साधला असता अशी घटना घडल्याचे सांगण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी आंबेडकर यांना काळे झेंडे दाखवले, विरोधाच्या घोषणा दिल्या तसेच गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावर हल्ला झाला नाही, असे भारिपच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाकडून ‘दिव्य मराठी’ला सांगण्यात आले. हल्ल्याची माहिती समजताच समाजमाध्यमांवर निषेध व्यक्त होत आहे.  
 
अॅड. प्रकाश आंबेडकर सातत्याने भाजप, मोदी आणि संघ परिवार यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे आंबेडकर यांना लक्ष्य करण्यात आले असावे. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. योगायोग म्हणजे महू हे बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान आहे. तेथेच त्यांच्या नातवावर हल्ल्याचा प्रयत्न होणे दुर्दैवी असल्याचे त्यांचे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
 
अकोल्यात रास्ता रोको 
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याचे वृत्त कळताच त्याचे पडसाद अकोल्यात उमटले. भारिपच्या  कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला. तसेच शहरात  रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  अॅड. आंबेडकर यांना अाता सरकारने कायम सुरक्षा द्यावी. दोषी लोकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही अांदाेलकांकडून करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...