आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानभाडे १२ % कमी, टूर पॅकेज १३ % महाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / नवी दिल्ली - होळीची पाच दिवस सुटी, एप्रिलमध्ये दोन वेळा तीन-तीन दिवस सुटी आणि उन्हाळ्याच्या सुट्या पर्यटनाला चांगला व्यवसाय देत आहे. सध्या टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर आयपीएलमुळे देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत देशांतर्गत विमान भाड्यांमध्ये १० ते १२ टक्के आणि आंतरराष्ट्रीय भाड्यांमध्ये २० टक्क्यांपर्यंत घसरण आली आहे. यानंतरही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज महागले आहेत.

ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ राजिंदर राय यांच्यानुसार, विमानभाडे स्वस्त असतानाही गेल्या वर्षीच्या तुलनेत टूर पॅकेज जवळपास १३ ते १५ टक्क्यांपर्यंत महाग झाले आहेत. पर्यटनस्थळाचे स्थानिक भाडे, तिकीट, हॉटेलभाडे, जेवण आदी कारणांमुळे पॅकेज महागडे झाले आहे. राय यांच्या म्हणण्यानुसार, टूर ऑपरेटरकडून नफ्यात वाढ करणे हेही कारण आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आणि परदेशात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ होण्याची आशा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त चौकशी केली जात आहे.
दक्षिण पूर्व आशियासोबत ग्रीस, जॉर्डन, हंगेरी, रशिया, जॉर्जिया, बल्गेरिया आणि भूतानची मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. कुटुंब किंवा मित्रांव्यतिरिक्त लोक एकट्यानेच फिरण्याला पसंती देत आहेत. हा एक नवा ट्रेंड दिसत आहे. मेक माय ट्रिपचे मुख्य व्यवसाय अधिकारी रंजित ओक म्हणाले, सरासरी हॉलीडे बजेट वाढले आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत ते ६० हजारांहून ७० हजार झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...