आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा गैरहजर,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या चौकशीकडे पुन्हा पाठ फिरवली आहे. कोकणातील बाळगंगा प्रकल्पातील अनियमिततेप्रकरणी पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना नोटीस जारी करण्यात आली होती. याच्या चौकशीसाठी मंगळवारी एसीबीने त्यांना स्वत: किंवा त्यांच्या वकिलास उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु नियोजित गणेशोत्सव भेटी कार्यक्रमांमुळे पवार स्वत: चौकशीस राहू शकले नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

सुनीलकुमार मुसळे, अॅड. कार्लोस आणि अॅड. मालवणकर यांनी पवारांची बाजू मांडली. यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी अजित पवारांना तर १५ सप्टेंबर रोजी तटकरे यांनी चौकशीला उपस्थित राहण्याबाबत एसीबीने समन्स जारी केले होते. मात्र, त्या वेळीही पवारांनी चौकशीला पाठ दाखवली होती. रायगड जिल्ह्यातील बाळगंगा प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी राजेश रिठे, विजय कासट तसेच कंत्राटदार निसार खत्री, अरविंद खत्री आणि जाहेद खत्री यांना अटक करण्यात आलेली आहे.