आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त आंबेडकर भवन सरकारच्या हाती जाणार!, विश्वस्तांच्या भूमिकेत बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाॅ. आंबेडकर भवनाच्या पाडकामप्रकरणी आंबेडकर गटाचा तीव्र िवरोध पाहून पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मूळ भूमिका आता बदलली अाहे. या वादग्रस्त ट्रस्टवर प्रशासक नेमावा तसेच प्रस्तावित १७ मजली आंबेडकर भवनाची इमारत राज्य सरकारने आपल्या देखरेखीखाली बांधावी, असा नवा प्रस्ताव ट्रस्टींनी तयार केला आहे. याप्रकरणी सरकारला साकडे घालण्यासाठी ट्रस्टचे सल्लागार व राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड िवश्वस्तांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेणार आहेत.

२५ जूनच्या पहाटे आंबेडकर भवनाची जीर्ण वास्तू ट्रस्टींनी गुपचूपपणे पाडून टाकली. त्याविरोधात अांबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये जनक्षाेभ उसळला आहे. ट्रस्टींच्या अाणि खासकरून ट्रस्टींचे सल्लागार रत्नाकर गायकवाड यांच्यावरोधात मोठे जनमत तयार झाले आहे. भवनाची जुनी इमारत पाडली खरी, पण समाजाच्या तीव्र संतापामुळे नवी इमारत बांधणे तितके सोपे नाही, याची जाणीव आता ट्रस्टींना झाली आहे. त्यातच ‘दादरशेजारच्या भवनाच्या भूखंडाला सोन्याचा भाव आहे. येथे १७ इमजली इमारत बांधून ट्रस्टींना ही जागा व्यावसायिक कारणासाठी वापराला द्यायची आहे. तसेच यामध्ये भाजपशी संबंधित एका बड्या िबल्डरचे उखळ पांढरे होणार आहे,’ असे आरोप ट्रस्टींवर होऊ लागले आहेत. त्यामुळे वैतागलेल्या ट्रस्टींनी आणि त्यांचे सल्लागार रत्नाकर गायकवाड यांनी याप्रकरणी आता चार पावले मागे यायचे ठरवले आहे. पीपल इम्प्रूव्हमेंट ट्रस्टवर प्रशासक नेमावा आणि त्यांच्याकरवी येथे नवी १७ मजली इमारत बांधून घ्यायची, असा नवा प्रस्ताव त्यांनी बनवला आहे. त्यासाठी सोमवारी रत्नाकर गायकवाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे.

१. २०११ मध्ये राज्य सरकारने आंबेडकर भवनाची वास्तू बांधण्यासाठी १० कोटींचा िनधी िदलेला आहे. नव्या इमारतीतले काही मजले बाबासाहेब आंबेडकर संशोधन अाणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) या सरकारी संस्थेस भाडेपट्ट्याने िदले जाणार असून त्या मोबदल्यात ट्रस्टला साठ कोटी आहेत. अशा ७० कोटींत येथे १७ मजली नवे भवन बांधण्याचा रत्नाकर गायकवाड अाणि ट्रस्टीचे िनयोजन आहे.

माओवादी सक्रिय असल्याची चर्चा, पाेलिसांकडून खातरजमा
याप्रकरणी मुंबईत मोर्चे, मोडतोड चालूच आहे. मागच्या आठवड्यात दादरमध्ये िवशाल मोर्चा िनघाला होता. त्याला हिंसक स्वरूप आले होते. भीमानुनायांच्या संतापाचा लाभ उठवत आंदोलन अधिकाधिक हिंसक करण्यासाठी माओवादी सक्रिय झाल्याचे सांगितले जात आहे. भोईवाडा पोलिसांनी मोर्चातील सहा आंदोलकांना अटक केली असून खातरजमा करण्याचे काम चालू आहे.
बातम्या आणखी आहेत...