आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचे चिरंजीव प्रचारात सक्रिय, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अमित यांचा संवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित हे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होण्याचे संकेत आहेत. मंगळवारी ते अधिकृत फेसबुक पेजच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधणार अाहेत. या फेसबुक लाइव्ह चॅटचा एक प्रोमो सध्या समाजमाध्यमांवर फिरत असून यामध्ये अमित ठाकरेंच्या फेसबुक पेजची माहिती देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत अमित यांनी मनसेच्या काही उमेदवारांच्या रोड शोला हजेरी लावली होती.    

ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील अादित्य ठाकरे हे युवा सेनेच्या माध्यमातून अगोदरच राजकारणात दाखल झाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी युवा सेनेच्या बांधणीला सुरुवातही केली आहे. विद्यार्थी आणि युवकांशी निगडित अनेक प्रश्नांवर त्यांनी गेल्या काही वर्षांत मोर्चे आणि आंदोलनेही उभारली आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता अमित ठाकरेंच्या रूपाने ठाकरे घराण्यातील आणखी एक चेहरा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी अमित ठाकरेंच्या अधिकृत फेसबुक पेजचे अनावरण होणार असून त्या वेळी ते मतदारांंशी लाइव्ह चॅटच्या माध्यमातून संवाद साधणार असल्याचे कळते. एकीकडे एकूणच महापालिका निवडणुकीबाबत पक्षात अनुत्साहाचे वातावरण असताना अमित ठाकरे प्रचारात कितपत उत्साह आणतात, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. अमित यांच्या राजकीय प्रवेशाबाबत यापूर्वीही अनेकदा राज ठाकरेंना छेडले असता, त्यांनीही त्यावर उत्तर न देणेच पसंत केले होते. तसेच यापूर्वी अमित यांनी कधीही कोणत्याही व्यासपीठावर कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य न केल्याने या चॅटद्वारे ते राजकीय प्रश्नांवर कशा पद्धतीने राजकीय भूमिका मांडतात, याकडे सर्व राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, अमित ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्ह चॅटचा एक प्रोमो...   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...