आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमूल दुधाची किंमत प्रति लिटर दोन रुपयांनी महागले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमुलच्या दूध किमतीमध्ये आजपासून प्रति लिटर दोन रुपयांनी दर वाढ होण्याची शक्यता आहे. गुजरात कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननं (GCMMF)  यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मागील वर्षांपासून अमूलने दुसऱ्यांदा दरवाढ करत असल्याचे सांगितले. तसेच गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये ग्राहकांवर याचा परिणाम होऊ शकतो. 
 
अमूलने त्यांच्या सर्वच 6 ब्रँडमध्येही दरवाढ केलेली आहे. यावेळी गुजरात कोऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) संचालक आर. एस सोढी म्हणाले की, शेतकऱ्यांकडून जास्त किमतीने दूध घेत असल्याने अमूल ब्रॅण्डला दुधाची दरवाढी करावी लागत आहे. 
 
 
सोढी यांनी सांगितले की, GCMMF च्यावतीने 2014 नंतर दूध आणि दुधाच्या अन्य उत्पादनात दरवाढ केली नव्हती. परंतु मागील दोन-तीन महिन्यामध्ये तूप, लोणी, बटर मिल्क, आणि आईस्क्रीम या उत्पादनात किरकोळ दरवाढ करावी लागली अशी माहिती सोढी यांनी दिली.  
बातम्या आणखी आहेत...