आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा हजारे हे संघाचे एजंट; राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अाघाडी सरकारच्या कार्यकाळात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार काेटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची सीबीअाय चाैकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली अाहे. मात्र, त्यावर संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्यासारखे काम करत असल्याचा अाराेप केला अाहे. 
 
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांवर अाधी जाणीवपूर्वक काेट्यवधी रुपये कर्जाचे डाेंगर उभारण्यात अाले. अाणि नंतर कारखाने डबघाईला अाल्याचे दाखवत ते कवडीमाेल दरात खासगी उद्याेजकांना विकण्यात अाल्याचा अाराेप अण्णा हजारे यांनी याचिकेत केला अाहे. तसेच शरद पवार व  अजित पवार यांच्यावरही या व्यवहारात भ्रष्टाचाराचे अाराेप करण्यात अाले अाहेत. या प्रकारामुळे संतापलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक म्हणाले, ‘अाघाडी सरकारच्या काळात वेगवेगळ्या मुद्द्यावर अांदाेलन करणारे अण्णा हजारे अाता भाजप सरकारच्या काळात अांदाेलन का करत नाहीत?  संघाचे एजंट असल्यासारखे ते वागत अाहेत,’ अशी टीकाही त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...