आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमेश कदमांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश, अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळा प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना काेट्यवधी रुपयांचा अार्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांची तब्बल १३५ काेटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. डी. टंकीवाले यांनी शुक्रवारी दिले आहेत.
 
त्यानुसार राज्याचा गुन्हे अन्वेषण विभाग राज्यातील विविध शहरांत असलेल्या ५४ मालमत्तांवर टाच अाणणार आहे. यात त्यांच्या २२ बँक खात्यांतील २ कोटी २३ लाख रुपये व रोख सापडलेले २० लाख ८६ हजार रुपये याचा समावेश आहे. कदम यांनी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नाशिक येथील घरे, शेतजमिनी, भूखंड अशी काेट्यवधी रुपयांची माया जमवली. तसेच त्यांच्या विविध २० बँक खात्यांमध्येही लाखाे रुपये अाहेत. या सर्व मालमत्तेची सध्याच्या बाजारभावाने एकूण किंमत १३५ काेटी १६ लाख ८२ हजार ६०८ रुपये इतकी अाहे. हा सर्व पैसा कदम यांनी महामंडळात जवळपास ४०० कोटी रुपयांचा घोटाळा करून कमावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कदम यांच्या विरोधात राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर यापैकी बहुतांश मालमत्ता तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आली आहे. यापूर्वी सक्तवसुली संचालनालयानेही कदम यांची काही मालमत्ता जप्त केली होती. सध्या अामदार रमेश कदम हे अटकेत अाहेत. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाद्वारे लाभार्थींच्या बोगस नावांवर कर्जांचे वाटप करणे, लाभार्थींचे धनादेश परस्पर वटवणे, खोटी कागदपत्रे तयार करणे असे आणखीही अारोप त्यांच्यावर आहेत.
बातम्या आणखी आहेत...