आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : ठाकूर यांना दिलासा; काेर्टाने श्रीनिवासन, शहांना फटकारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - न्यायालयाच्या आदेशानुसार अपात्र ठरलेली कोणतीही व्यक्ती बीसीसीआयच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, प्रतिनिधित्व करू शकत नाही, असे खडसावत सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि माजी सचिव निरंजन शहा यांना एका आठवड्यात उत्तर देण्यास आज सांगितले. त्याबाबतची पुढील सुनावणी येत्या २४ जुलै रोजी होणार आहे. दुसरीकडे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना न्यायालयाने दिलासा दिला.
 
न्यायालयाच्या अवमान प्रकरणी दाखल केलेला ठाकूर यांचा माफीनामा सर्वाेच्च न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे त्यांना माेठा दिलासा मिळाला अाहे. दुसरीकडे श्रीनिवासन अाणि शहा यांना मात्र फटकार बसली. याशिवाय त्यांना अाता अाठवडाभरात अापला खुलासाही  करावा लागणार अाहे.   
 
सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने आज प्रशासकांच्या अहवालावर आणि निष्कर्षांवरही आपले मत नोंदविले. पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालय या दोघांबाबत  निर्णय जाहीर करेल.
 
ठाकुरच्या प्रकरणावर पडदा!
सर्वाेच्च न्यायालयाने शुक्रवारी अनुराग ठाकूरचा माफीनामा मंजूर केला. त्यामुळे अाता या अवमान प्रकरणावर पडदा पडला. ठाकूरने सुरुवातीलाच या प्रकरणी माफी मागितली  हाेती. त्यांना ७ जुलै राेजी न्यायालयाने माफी मागण्याचे अादेश दिले हाेते. याशिवाय या प्रकरणामुळे ठाकूर यांना माेठा दिलासा मिळाला अाहे. 
 
अाता २४ जुलैला सुनावणी
श्रीनिवासन अाणि माजी सचिव निरंजन शहा यांना खुलासा देण्याचे अादेश देण्यात अाले. त्यानंतर या प्रकरणावर २४ जुलै राेजी सुनावणी हाेणार अाहे. बैठकीत सहभागी हाेण्याचे कारण या दाेघांना स्पष्ट करावे लागणार अाहे. यातील काही त्रुटींचाही त्यांना पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता अाहे. त्यामुळे हे प्रकरण त्यांच्या अंगलट येणार अाहे. 
 
न्यायालयात चर्चेसाठी आलेले पुढील मुद्दे 
- प्रशासक मंडळाचे सदस्य रामचंद्र गुहा आणि विक्रम लिमये यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले.
- त्यांच्या जागी घ्यावयाच्या सदस्यांसाठी न्यायमित्रांनी बंद लिफाफ्यात सहा नावे दिली आहेत.
- प्रशासक मंडळासाठी बीसीसीआयला १० दिवसांत ४ नावे सुचविण्यास सांगितले गेले आहे.
- प्रशासक मंडळाने सादर केलेल्या अहवालात श्रीनिवासन अाणि निरंजन शहा सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना अडथळे आणत असल्याचे म्हटले आहे.
 
- त्यावर खंडपीठाने स्पष्ट केले की, अपात्र सदस्यांची बैठकीसाठी नियुक्ती होऊ शकत नाही.
- न्यायालयाने त्यानंतर श्रीनिवासन अाणि माजी सचिव निरंजन शहा यांना येत्या ७ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले.
- २४ जुलैला श्रीनिवासन आणि निरंजन शहा यांच्या उत्तरांवर आणि प्रशासक मंडळाने सादर केलेल्या अहवालावर पुढील सुनावणी होईल.
- कपिल सिब्बल यांनी न्यायालयात आरोप केला की प्रशासक मंडळ श्रीनिवासन व शहा यांना लक्ष्य करीत आहे.
- अनुराग ठाकूर यांनी   खोटे शपथपत्राबाबत माफी मागितली. न्यायालयाने त्या माफीचा स्वीकार केला.
- रेल्वे, महाराष्ट्राने बीसीसीआय मधील आपले अधिकार कायम ठेवावेत, असा आग्रह धरला.
- न्यायालयाची सहानुभूती, त्याबाबतची पुढील सुनावणी ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...