आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इग्नूचे डॉ. ई. वायुनंदन यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ.ई. वायुनंदन यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी ५ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी ही घोषणा केली. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी १९ ऑगस्ट २०१६ रोजी कुलगुरुपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. तेव्हापासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. 
बातम्या आणखी आहेत...