आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा भांड, मोरे, करंबेळकर यांची मंडळांवर नियुक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठी भाषा विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा सल्लागार समिती आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांची फेररचना करण्यात आली आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक बाबा भांड यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

ज्येष्ठ साहित्यिक आणि अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांची मराठी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी तर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अध्यक्षपदी विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची निवड करण्यात आली आहे.

साहित्य आणि संस्कृती मंडळ : मंडळात एकूण २८ सदस्य असून रेखा बैजल, रेणू पाचपोर, उत्तम बंडू तुपे, शशिकांत सावंत, इब्राहिम अफगाण, रवींद्र गोळे, सुधीर पाठक, सुधीर जोगळेकर, अशोक कोतवाल, विदर्भ साहित्य संघाचे वामनराव तेलंग यांचा त्यात समावेश आहे.

राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात २३ सदस्य असून मेजर जनरल शशिकांत पित्रे, अरुण फडके, सुहास बहुलकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. चंद्रशेखर सोलापुरे, विवेक घळसासी, वसंत आबाजी डहाके, प्रा. लक्ष्मणराव टोपले यांचा त्यात समावेश आहे.

भाषा सल्लागार समिती : या समितीवर २८ सदस्य असून यामध्ये हेमचंद्र प्रधान, प्रा. शंकर धडके, अविनाश बिनीवाले, प्रा. पुष्पा गावित, डॉ. गिरीश दळवी, माधव जोशी, अश्विनी मयेकर, स्वाती राजे, दीपक गायकवाड, विनोद राठोड यांच्यासह मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव आणि भाषा संचालनालयाच्या संचालकांचा समावेश आहे

राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ : मंडळात २३ सदस्य असून मेजर जनरल शशिकांत पित्रे, अरुण फडके, सुहास बहुलकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. चंद्रशेखर सोलापुरे, विवेक घळसासी, वसंत आबाजी डहाके, प्रा. लक्ष्मणराव टोपले यांचा त्यात समावेश आहे.

भाषा सल्लागार समिती : या समितीवर २८ सदस्य असून यामध्ये हेमचंद्र प्रधान, प्रा. शंकर धडके, अविनाश बिनीवाले, प्रा. पुष्पा गावित, डॉ. गिरीश दळवी, माधव जोशी, अश्विनी मयेकर, स्वाती राजे, दीपक गायकवाड, विनोद राठोड यांच्यासह मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव आणि भाषा संचालनालयाच्या संचालकांचा समावेश आहे
बातम्या आणखी आहेत...