आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबारप्रकरणी पुजारी टाेळीतील तिघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्यावर्षी विलेपार्ले येथील हॉटेलमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी गँगस्टर रवी पुजारी टोळीतील तिघांना खंडणीविरोधी पथकाने सोमवारी अटक केली. दरम्यान, गुजरात येथील नगरसेवकांवरही त्यांनी प्राणघातक हल्ला केल्याचा संशय आहे. 

सुरेश पुजारी ऊर्फ सुरेश अण्णा, रमेश पुजारी आणि मृत्युंजय दास अशी आरोपींची नावे आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात विलेपार्ले येथील एका हॉटेलात घुसून तिघांनी व्यवस्थापकाच्या दिशेने गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला. तसेच त्यांनी आम्हाला रवी पुजारीने खंडणीसाठी पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर व्यवस्थापकाने पोलिसांत तक्रार दिली. सोमवारी तिघांना मुंबई  व उपनगराच्या वेगवेगळ्या भागांतून अटक करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...