आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपाईतही घराणेशाही: 13 वर्षांचा मुलगा बालआघाडी अध्यक्ष; आठवले पक्षाध्यक्ष, पत्नीकडे हे महत्त्वाचे पद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अाठवले गट) या पक्षाच्या बाल आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी या पक्षाचे प्रमुख व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे १३ वर्षीय पुत्र जीत आठवले यांची बुधवारी निवड जाहीर करण्यात आली. चेंबूर नाका येथे एका कार्यक्रमात जीत यांचा पक्षप्रमुख रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जीत आठवले यांच्या हस्ते रिपाइंच्या बाल आघाडी  चेंबूर तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या निवडीसुद्धा करण्यात आल्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, अभयाताई सोनवणे, शकुंतलाताई आठवले तसेच  रवी गायकवाड, संजय डोळसे,  हेमंत रणपिसे, सुनील शिरसाट, प्रभावती रणदिवे, अशोक घोक्षे आदी उपस्थित होते.  तर रिपाइंच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी आठवले यांच्या पत्नी सीमा या पूर्वीपासूनच काम पाहात आहेत, आता त्यांचा अठरावर्षे वयाच्या आतील मुलगाही देखील रिपाइंत कार्यरत राहणार असे िदसते.
बातम्या आणखी आहेत...