आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणात रस नाही, नायिकाच व्हायचे होते, अथिया शेट्टीने व्‍यक्‍त केल्‍या भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘लहानपणापासूनच मी नायिका व्हायचे स्वप्न पाहिले होते; परंतु वडिलांपासून (सुनील शेट्टी) मी हे लपवून ठेवले होते. अखेर आईला (माना) एका परदेश दौऱ्यात मी सांगितले की, पुढे शिक्षण घेण्याची माझी इच्छा नाही, मला अभिनय करायचा आहे. मला वाटले होते, आई-बाबा नाराज होतील; परंतु दोघांनीही मला प्रोत्साहन दिले आणि मी आता प्रेक्षकांसमोर नायिका म्हणून येते आहे,’ अशा भावना अथियाने व्यक्त केल्या.
अथिया व अादित्य पांचाेलींचा मुलगा सूरज यांचा ‘हीरो’ चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. सलमान खान द्वारा निर्मित या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांनीही ‘दिव्य मराठी’शी खास गप्पा मारल्या. अथिया म्हणाली, सलमानची बहीण माझी चांगली मैत्रीण होती. आम्ही जिममध्ये भेटायचो. तिनेच एकदा सलमानला माझ्याबद्दल सांगितले. सलमानने मला बोलावले आणि ‘हीरो’ची ऑफर दिली. त्यानंतर मी बाबांना फोन केला आणि सांगितले तेव्हा ते खूप आनंदी झाले. सलमान आणि बाबा चांगले मित्र असून सलमानवर खूप विश्वास असल्यानेच त्यांनी मला परवानगी दिली. हा चित्रपट जॅकी श्रॉफ -मीनाक्षी शेषाद्री अभिनीत ‘हीरो’चा रिमेक असून त्यात आजच्या काळानुसार बदल केले आहेत. प्रेक्षकांना ही नवीन प्रेमकथा नक्कीच आवडेल, असेही अथिया म्हणाली.
जिया प्रकरणाचा परिणाम : सूरज
जिया खान प्रकरणाचा माझ्या अायुष्यावर मोठा परिणाम झाला. त्यातून लगेच सावरणे शक्य नाही; परंतु मी पुढे जायचे ठरवले आहे. या घटनेतील सत्य बाहेर यावे आणि मी दोषी असेन तर मला शिक्षा व्हावी, असे सूरज पांचोलीने सांगितले. ‘एक था टायगर’च्या वेळेस सलमानने मला चित्रपटात घेणार, असे म्हटले होते. मध्ये खूप महिने गेले; परंतु सलमानकडून फोन आला नाही त्यामुळे मला प्रश्न पडला होता; परंतु एक दिवस मला सलमानचा फोन आला आणि त्याने ‘हीरो’चा तू नायक असल्याचे सांगितले. या चित्रपटासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. जॅकी श्रॉफ ज्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये स्टार झाला तसाच मीही होईन याची खात्री वाटते, असा विश्वास सूरजने व्यक्त केला.