आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्दीच धास्तावली: कायद्याचे धिंडवडे; पाेलिसांवरच जीवघेणे हल्ले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे/ संगमनेर- मुंबईत दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदेंचा झालेला मृत्यू आणि भाजप आमदाराने चुकीची कामे करण्यासाठी टाकलेल्या दबावाला कंटाळून जालना जिल्ह्यातील बदनापूरचे पोलिस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी आत्महत्या करण्याचा घेतलेला टोकाचा निर्णय या घटना ताज्या असतानाच ठाणे व संगमनेरमध्ये (जि. अहमदनगर) शनिवारी पोलिसांवर जीवघेणे हल्ले झाले. त्यामुळे ‘सद‌्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रीद उराशी बाळगून कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलिसच सुरक्षित राहिले नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. कायद्याचा थोडासाही धाक नसलेले धटिंंगण पोलिसांवरच जीवघेणे हल्ले चढवत असल्यामुळे पोलिसांवरच आधी स्वत:चे रक्षण करण्याची वेळ आली आहे.

पोलिस महासंचालक माथूर म्हणतात...
जनतेचा रोष पोलिसांनाच सहन करावा लागत आहे
राज्यात रस्त्यांवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच जनतेचा रोष सहन करावा लागत असल्यामुळे वाद वाढले आहेत. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर यांनी म्हटले आहे. मात्र जनतेचा हा रोष नेमका सरकारवर आहे की प्रशासनावर याचे उत्तर मात्र पोलिस महासंचालकांनी टाळले.

राज्यात गेल्या काही दिवसांत पोलिसांवरच हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. या आठवड्यातच हल्ल्याच्या चार घटना घडल्यामुळे या पोलिसांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर बकरी ईद आणि गणेशोत्सव एकत्रच येत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद भेटीवर आलेल्या माथूर यांना विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आणि पोलिसांचे मनाेधैर्य वाढण्याचा प्रयत्न केला.

हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करू
पोलिसांवरील हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. हल्ले करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. ’
सतीशचंद्र माथूर, पोलिस महासंचालक

कायद्याचा दरारा नाही
महाराष्ट्रात कायद्याचा दरारा उरलेला नाही हे पोलिसांवरील हल्ल्यांवरून दिसते. विशेषत: तरुणांना पोलिसांचा धाक वाटत नाही हे गंभीर आहे.’
अरविंद इनामदार, माजी पोलिस महासंचालक

दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात वाहतूक पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदेंचा मृत्यू झाल्यामुळे व्यथित झालेल्या ठाण्यातील सर्व पोलिस कॉन्स्टेबलच्या पत्नींनी शनिवारी कँडल मार्च काढून निषेध नोेंदवला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोठे कशा घडल्या आहेत घटना...
बातम्या आणखी आहेत...