आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वयंपाकघरात धर्म लादला, तर आम्ही सहन करणार नाही; उद्धव ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘पर्युषण काळात आठ दिवस मांस विक्री बंदीचा वाद आम्ही घातला नाही. ज्यांनी हा वाद सुरू केला त्यांनीच संपवावा. तुमचा धर्म आमच्या स्वयंपाकघरात लादला, तर आम्ही ते सहन करणार नाही,’ या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिले.
गुरुवारी सकाळी जोगेश्वरी येथे उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात ठाकरे व शेलार एकत्र होते. या वेळी मांस विक्रीवरून उदभवलेल्या वादाचा संदर्भ देत शेलार म्हणाले, ‘आपल्याला सर्वच समाजाला एकत्र घेऊन जायचे आहे त्यामुळे पर्युषण काळावरून निर्माण झालेल्या वादावर आता पडदा टाकूया. पुलाच्या नावावरून झालेल्या वादावर जसा पडदा टाकला तसा या वादावर पडदा टाकून समाजात विद्वेष निर्माण होऊ नये याची जबाबदारी सर्व पक्षांच्या नेत्यांची असते,’ असा सल्लाही त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला दिला. इतकेच नव्हे, तर पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्याचा कालावधी कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घ्यावा, असेही शेलार यांनी म्हटले.
शेलार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, ‘पर्युषण पर्वातील मांस विक्री बंदीचा वाद आम्ही घातलेलाच नाही. ज्यांनी हा वाद सुरू केला त्यांनीच हा वाद संपवावा. वाद घालण्याची आम्हाला खाज नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, परंतु तुमचा धर्म जर आमच्या स्वयंपाकघरात लादला जात असेल, तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही.’

पुढील स्‍लाइडवर वाचा ‘भावनांना राजकीय स्वरुप देऊ नका’