आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोमांसाची तस्करी; चार जण अटकेत; मुंबई पोलिसांची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुमारे दोन हजार ४०० किलो ग्रॅम गोमांसाची तस्करी करणाऱ्या चौघांना मुंबई पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने राज्यात गोवंश हत्याबंदी लागू केली आहे. त्यानंतर ही मोठी कारवाई मानली जात आहे. अख्तर शेख, साजिद कुरेशी, युनिस कुरेशी आणि जाफर खान अशी आरोपींची नावे आहेत. चौघे जण गोमांसाची तस्करी करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केली. त्यांच्यावर गोवंश हत्याबंदी कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत राज्यात गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोमांसाची तस्करी वाढली असून अजूनही ठिकठिकाणी मांस तस्करीचे प्रकार घडत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...