आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात चर्चित ‘भीम’ अॅपमध्ये अशा आहेत उणिवा-अडचणी; तरीही 8 दिवसांत 60 लाख लोकांनी केले डाऊनलोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅप तयार करणाऱ्या एनपीसीआयचे एमडी ए. पी. होता यांनी सांगितले की, रोज १० लाख लोक ते डाऊनलोड करत आहेत. - Divya Marathi
अॅप तयार करणाऱ्या एनपीसीआयचे एमडी ए. पी. होता यांनी सांगितले की, रोज १० लाख लोक ते डाऊनलोड करत आहेत.
मुंबई- डिव्हाइस बाइंडिंग फेल्ड. ‘भीम’ या बँकिंग अॅपचे युजर विवेक गुप्ता यांना दोन दिवसांपासून हा मेसेज मिळत आहे. त्यांनी स्वत: ‘भीम’ अॅपच्या गुगल प्ले स्टोअरच्या डाऊनलोडिंग प्लॅटफॉर्म पेजवर ही कमेंट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, मी दुसऱ्या डिव्हाइसवरही प्रयत्न केले, पण तेथे बँक सिस्टिम ऑफलाइन दाखवली जात आहे. या पेजवर कमेंट करताना पंकज परमार म्हणतात की, मी ते पहिल्याच दिवशी डाऊनलोड केले होते, पण आतापर्यंत (५ जानेवारीला कमेंट लिहीपर्यंत) एकही ट्रान्झॅक्शन पूर्ण करू शकलो नाही. ही अडचण फक्त या दोन युजरलाच येते असे नाही, तर मोठ्या संख्येने लोकांना सरकारच्या या चर्चित अॅपमध्ये लहान-लहान अडचणी येत आहेत.
 
३० डिसेंबरनंतर फक्त ६ दिवसांत ६० लाखांपेक्षा जास्त लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. अॅप तयार करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआय) एमडी आणि सीईओ ए. पी. होता यांनी सांगितले की, रोज १० लाख लोक ते डाऊनलोड करत आहेत. आगामी काही दिवसांत त्यात अनेक महत्त्वाचे फीचर जोडण्याची तयारी सुरू आहे. काही दिवसांआधी नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विट करून ते प्ले स्टोअरवर भारतातील सर्व अॅप्समध्ये टॉपवर असल्याचे म्हटले होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबरला डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी भीम (भारत इंटरफेस फॉर मनी) हे मोबाइल अॅप  लाँच केले. भीम हे  मोबाइल अॅप सरकारच्या जुन्या यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) आणि यूएसएसडीचे (अ स्ट्रक्चर्ड सप्लिमेंट्री सर्व्हिस डाटा) अपडेटेड व्हर्जन आहे. त्याद्वारे डिजिटल पेमेंट घेतले आणि पाठवले जाऊ शकते. मोठी अपेक्षा आणि घोषणेनंतर लाँच केलेल्या भीम अॅपचा वापर करताना युजर्सना अनेक उणिवा जाणवत आहेत. सरकारने हे महत्त्वाकांक्षी अॅप घाईगडबडीत आणले आहे, असे या उणिवांवरून दिसत आहे. होता सांगतात की, सध्या हे अॅप पैसे जमा करणे, पैसे पाठवणे आणि शिल्लक रकमेची माहिती देणे या तीन सुविधा देत आहेत. पुढील दोन आठवड्यांत ते आयफोनसाठीही लाँच केले जाईल. 

आम्ही १०० दिवस १०० शहरांसाठी डिजिटल मेळा आयोजित करत आहोत. त्याबाबत लवकर माहिती मिळावी हा हेतू. वारंवार ट्रान्झॅक्शन फेल होणे किंवा प्रोसेस पूर्ण न झाल्याबद्दलच्या प्रश्नावर होता म्हणाले की, अशा तक्रारी आमच्याकडेही येत आहेत, पण त्या कमी आहेत. अनेकदा नेट कनेक्शनमुळेही तसे होते. दररोज फक्त २० हजार रुपये मर्यादा असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही लवकरच ही मर्यादा यूपीआय अॅप्सप्रमाणे दररोज एक लाख रुपये एवढी करू. आयटी तज्ज्ञ अभिषेक धाभई म्हणाले की, या अॅपमध्ये अकाउंटचे डिटेल आणि फोनचा आयएमईआय क्रमांकही शेअर होतो. त्यामुळे त्याची सुरक्षितता खूप चांगली असायला हवी. पण सायबर अटॅक किंवा हॅकिंगपासून बचावासाठी सरकारने अधिकृतरीत्या कोणत्याही प्लॅटफॉर्मची घोषणा केली नाही. सरकारने त्याच्या सुरक्षेची जबाबदारी एका खासगी संस्थेला दिली आहे.

‘भीम’ हे अॅपमध्ये तीन मोठ्या उणिवा
1) पेमेंटचा पर्याय नाही

अकाउंट किंवा यूपीआय क्रमांक असेल तरच मर्चंटला पेमेंट केले जाऊ शकते. अकाउंटमध्ये तर डायरेक्ट मर्चंट पेमेंट घेत नाही आणि यूपीआय अजून लोकप्रिय नाही. युटिलिटीचे बिल पेमेंट, रिचार्ज, तिकीट बुकिंगची सुविधा नाही. पेटीएम अॅपवर या सर्व सुविधा आहेत.

2) काँटॅक्टपर्यंत पोहोच नाही
कोणाकडे यूपीआय अॅड्रेस आहे हे सांगणारे काँटॅक्ट बुकचे फीचर अॅपमध्ये नाही. म्हणजे यूपीआय अॅड्रेस आहे की नाही, आहे तर काय आहे, हे आधी समोरच्याला विचारावे लागेल. असे काँटॅक्ट बुक व्हॉट्सअॅपमध्ये वेगळे असते. ते फीचर भीममध्येही असायला हवे.

3) आधारशी लिंक नाही
सरकार म्हणते की, अंगठा हीच तुमची बँक. पण भीम सध्या आधार क्रमांकाशी लिंक होत नाही. ते मोबाइल क्रमांक तपासते. सिक्युरिटीही फक्त चार आकड्यांच्या पिनने होते. याउलट पेटीएमसारखे अॅप फिंगर प्रिंटने सिक्युरिटी देत आहेत. 

‘भीम’ हे अॅप वापरताना इतर अॅपच्या तुलनेत येणाऱ्या अडचणी 
4) मर्यादा - रोज २० हजार रुपयांचे जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन शक्य. एकदा सर्वाधिक १० हजारच. फीचर फोनने तर दररोज ५ हजार रुपयांचीच मर्यादा. 
इतर अॅप -  यूपीआय अॅपअंतर्गत विविध बँकांतून रोज ५० रु. ते १ लाख रु.पर्यंतचे ट्रान्झॅक्शन करू शकते.

5) रिवाॅर्ड - भीम अॅपने पेमेंट केले तर सरकारने कॅशलेस पेमेंटबद्दल जाहीर केलेलेच लाभ मिळतील. अॅपशी संबंधित दुसऱ्या रिवाॅर्डची योजना नाही.
इतर अॅप- इतर अॅप : एसबीआय बडी, पेटीएम, येस बँक हे आपल्या अॅपने बिल देणे, शॉपिंग करणे यावर कॅशबॅक आणि रिवाॅर्ड देतात. 

6) अकाउंट - या अॅपने ट्रान्झॅक्शन करायचे असेल तर फक्त एकाच बँक अकाउंटशी जोडले जाऊ शकते. नोंदणीसाठीही कार्ड आवश्यक, अन्यथा नाही.
इतर अॅप-  यूपीआयमध्ये इतर बँकांचेही अकाउंट जोडू शकता. पेटीएममध्ये अनेक अकाउंटमधून पैसे ट्रान्सफअर करू शकता.

7) नोटिफिकेशन - या अॅपमध्ये जे नवे फीचर जोडले जातात, त्याचे नोटिफिकेशन अॅपवर मिळत नाही. डाऊनलोड केल्यावर अकाउंट सेटिंगसाठी १.५ रु. कटतात
इतर अॅप- इतर अॅप : पेटीएम ते फ्री चार्जपर्यंत सर्व यूजरला नोटिफिकेशन पाठवतात. ते मोफत डाऊनलोडही होतात.
बातम्या आणखी आहेत...