आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त: दीड वर्षानेही बिहारला नाही मिळाले 1.25 लाख कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात ऑक्टोबर २०१५ मध्ये मोदींनी बिहारला १.२५ लाख कोटींंचे पॅकेज देण्याची घोषणा केली. पण ही घोषणा केवळ निवडणूक फार्सच होती हे सिद्ध झालय. दीड वर्ष गेल्यानंतरही राज्याला रुपयाही मिळाला नाही. ही माहिती एका आरटीआयमध्ये समोर आली. मुंबईचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी डिसेंबर २०१६ मध्ये अर्थ मंत्रालयाकडून माहिती मागितली होती. त्यांनी विचारले की, पंतप्रधानांनी विविध राज्यांना पॅकेज  देण्याची जी घोषणा केली त्यातून किती पैसे केव्हा दिले गेले. आरटीआयचे उत्तर अर्थ मंत्रालयाचे उपसंचालक आनंद परमार यांनी दिलेे. पण यात सरळ सरळ काहीही सांगितलेले नाही. गलगली यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी ज्या ज्या योजनांच्या घोषणा केल्या त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील. तथापि आतापर्यंत तरी एकही रुपया जारी केलेला नाही. गलगलींनी सांगितले की, सरकारचे हे आकडे सत्तारूढ पक्षांच्या दाव्यांचे समर्थन करत नाहीत. 
या प्रकारे सिक्कीममध्ये पर्यटनाच्या पायाभूत सोयी विकसित करण्यासाठी १५ जून २०१६ रोजी ४३,५८९ कोटी रुपयांच्या पॅकेज-निधीची घोषणा झाली होती. पण हे पैसेही अद्यापपर्यंत जारी झालेले नाहीत. 
 
दुसऱ्या राज्यांनाही आहे निधीची प्रतीक्षा 
असे नाही की फक्त बिहारला पैसे दिले गेले नाहीत. पंतप्रधानांनी ७ नोव्हेंबर २०१५ रोजी जम्मू-काश्मीरसाठी ८०,०६८ कोटी रुपयांची घोषणा केली होती. आरटीआयच्या उत्तरात सांगितले गेले की, ही रक्कम भीषण पुराने झालेल्या नुकसानीची दीर्घ काळाची भरपाई आणि विकासकार्यासाठी आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...