आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप विस्ताराचे 268 मतदारसंघांत काम सुरू; शिवसेनेचे नेते गळाला लावण्याचे प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेस, राष्ट्रवादी, िशवसेना हे पक्ष भाजपवर टीका करण्यात वेळ घालवत असताना सत्ताधारी भाजपने सन २०१९ च्या िनवडणुकांसाठी आतापासून तयारी सुरू केली आहे. अापल्या पक्षाचा अामदार नसलेल्या मतदारसंघात भाजपने ‘प्रभारी आमदार’ नियुक्त केला अाहे. तसेच एकूण २८८ पैकी २६८ मतदारसंघांत  पक्ष िवस्तारकांची नेमणूकही केली अाहे.
   
निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने  रामभाऊ म्हाळगी प्रबाेधिनीत नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह ज्येष्ठ नेते, मंत्री, खासदार, अामदारांची बैठक झाली. त्यात पुढील दाेन वर्षांसाठी रणनीती ठरवण्यात अाली.  रवींद्र भुसारी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले भाजपचे प्रदेश संघटन मंत्रिपद रिक्त अाहे. मात्र या पदावर काेणाची नेमणूक हाेण्याची वाट न पाहता निवडणुकांची तयारी सुरू करावी, अशी सूचना पक्षश्रेष्ठींकडून प्राप्त झाली अाहे. त्यानुसार प्रदेश भाजपकडून तयारी केली जात अाहे.  

भाजपचा प्रत्येक िवस्तारक जबाबदारी असलेल्या  िवधानसभा मतदारसंघात २७५-३०० बूथची बांधणी करेल. प्रत्येक बूथमध्ये २५ जणांची टीम असणार असून सुमारे ७,५०० बूथ कार्यकर्ते घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार करतील. कुठलाही गाजावाजा न करता हा प्रचार असणार असून   त्याचा अहवाल ते पक्ष संघटनेकडे २०१८ च्या अखेरीस देतील अाणि यावरून िनवडणुकीची रणनीती तयार करण्यात येईल. या विस्तारकांना व प्रभारी अामदारांना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सर्व ताकद पुरवेल. एकाच वेळी दोन पातळीवर काम सुरू केल्याने मतदारसंघात पक्षासाठी पोषक वातावरण तयार होईल अाणि काही नाराजी असल्यास त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी िदली. 
 
शिवसेनेला खिंडार पाडण्याची तयारी    
शिवसेनेचे १८ खासदार व ६३ आमदार अाहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी शिवसेनाच असेल. त्यामुळे या पक्षातील असंतुष्ट खासदार व अामदारांना गळाला लावण्याची तयारी भाजपने सुरू केली अाहे. त्यांना पक्षात घेऊन भाजपची उमेदवारी देण्याचा विचार आहे. याचबरोबर शिवसेनेच्या शाखेच्या धर्तीवर भाजपची बूथ संघटना आक्रमक करून शहरे तसेच निमशहरांमध्ये पक्षाचा पाया भक्कम करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...