आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कोट्यधीश\' पराग शहा, तर ‘पालावरचं जिणं’ जगणाऱ्या राजश्री काळे थेट लोकप्रतिनिधी सभागृहात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदारराजाने पुण्या-मुंबईत निवडणुकीत भाजपला भरभरून कौल दिला. निवडून येणाऱ्यांतही वैशिष्ट्यपूर्ण चेहरे आहेत. पुण्यात राजश्री काळे यांच्या रूपाने पारधी समाजाची पुण्यातील पहिली नगरसेविका निवडून आली. तर, दुसरीकडे मुंबईत ६९० कोटींच्या संपत्तीचे मालक आणि सर्वांत श्रीमंत उमेदवार म्हणून चर्चेत आलेले पराग शहा या कोट्यधीश उद्योगपतीलाही भाजपच्या मतदारांनी निवडून दिले.
 
राजश्री काळे : पारधी समाजातील नगरसेविका
पुणे - फिरस्त्यांचं जगणं, मुख्य प्रवाहापासून पिढ्यान् पिढ्या दूर आणि गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का सोबत अपार दारिद्र्य... या परिस्थितीशी संघर्ष करत पुणे मनपाच्या निवडणुकीत पारधी समाजाच्या भाजपच्या उमेदवार राजश्री काळे यांचा विजय उपेक्षितांना न्याय देणारा ठरला. आमचं पालावरचं जिणं आता समाजासमोर येईल. सामाजिक कामाची सुरवातीपासूनची आवड अाता काम करताना बळ देईल, असे काळे सांगतात. राजश्रीताई गरवारे कॉलेजमध्ये शिपाई आहेत. त्यांचे मूळ गाव सोलापूर. पाच भावंडं. शिवाय नेहमी समाजावर होणारा अन्याय. गरजेपुरते शिक्षण आणि व्यवहारज्ञान मिळवलं. २०१० मध्ये भटक्या विमुक्त समाजातील महिलांच्या जीवनावर ‘आयाबाया’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. त्या सांगतात, माझ्या त्या पुस्तकातील एक व्यक्तिरेखा राजश्री काळे होती. तिचाच आज विजय झाला आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा सातशे काेटींचे मालक मुंबईचे ‘सेवक’...
बातम्या आणखी आहेत...