आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरच नव्हे, पुढील मुख्यमंत्रीही आमचाच, वेगळ्या वाटेवर चालण्यास सुरुवात केली आहे -उद्धव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे शिवसेना सलग पाचव्यांदा मुंबईत मोठा पक्ष म्हणून समोर आला. यासाठी मुंबईकरांबरोबरच शिवसैनिकांचे मनःपूर्वक आभार. आता केवळ आमचा महापौरच नव्हे, तर पुढील मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच असेल, अशी प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
 
मुंबई महापालिका निवडणुकीत ८४ जागा पटकावून शिवसेनेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबईतील फक्त मराठी मतदारांनीच नव्हे तर अमराठी मतदारांनीही शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. त्यामुळे बेहराम बागेत आमचा मुस्लिम उमेदवारही निवडून आला असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ता आणि संपत्तीची ताकद पणाला लावलेली असतानाही शिवसैनिकांनी जे यश खेचून आणले आहे त्याला तोड नाही. भाजपने सत्ता स्थापनेसाठी युतीची वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे.
 
 सत्ता स्थापनेसाठी भाजपशी युती करणार का विचारता उद्धव ठाकरे म्हणाले, या सगळ्या गोष्टींना अजून वेळ आहे. विजयाचा आनंद घेऊ दे, तुम्हाला एवढी घाई का आहे? वेळ येईल तेव्हा कळेलच. मी वेगळ्या वाटेवरून चालण्याचा निर्णय घेतला आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. मग असे प्रश्न का विचारता? २५ वर्षे केंद्रात आणि राज्यात आम्हाला विनवण्या कराव्या लागत होत्या. आता त्यांना करू दे, थोडी कळ सोसा. आणि त्यांनी काय म्हटले त्यावर मी उत्तर का देऊ असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला.
 
शिवसेनेचा महापौर येणार का विचारता उद्धव ठाकरे म्हणाले, महापौरपदाची निवडणूक तर घोषित होऊ दे त्यानंतर त्याबाबत बोलू. केवळ आमचा महापौरच नव्हे तर पुढील मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच असेल असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मतदार यादीतून नावे गायब करण्याचे एक मोठे षडयंत्र होते आणि त्याची चौकशी होणे आवश्यक आहे असे उत्तर याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी दिले.
 
 
कोण काय म्हणाले...
उद्धव ठाकरे
- मराठी बांधवांचे आभार मानण्यासाठी शब्द नाहीत. 
- इतर भाषिक मतदानही मोठ्या प्रमाणावर झाले.
- मुस्लीम मतदारही काही प्रमाणात शिवसेनेकडे बळले. 
- मतदार यादीतून नावं गहाळ होणं हा एक मोठा घोळ आहे. मतदानाचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 
- भाजपने जी ताकद पणाला लावली त्यावरून त्यांना यश मिळाले असे म्हणता येणार नाही.
- आमचा पक्ष मुंबईतील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. 
- आमच्या काही जागा फार थोड्या मतांनी गमावल्या. 
 
देवेंद्र फडणवीस
- मोदींच्या प्रामाणिक पणाला मुंबईच्या जनेतेने आशिर्वाद दिला. 
- नागपूर, पुणे, अकोला, अमरावतीतही आम्ही मोठा विजय मिळवला आहे. 
- सोलापूर, नाशिक, उल्हासनगरमध्येही आम्ही मोठा विजय मिळवला आहे. 
- 13 ते 14 जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा अध्यक्ष होईल.
- 8 ते 9 जिल्हा परिषदांमध्ये भाजप बहुमताच्या जवळ पोहोचेल. 
- लातूर, सांगली सारख्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये प्रचंड यश मिळाले आहे. 
- मराठवाड्यातही भाजपला मोठा पाठिंबा मिळाला आहे. 
- संपूर्ण महाराष्ट्राने भारतीय जनता पक्षाच्या कामावर मोहोर उमटवली आहे. 
 
आशिष शेलार..
- विजयाचे श्रेय नरेंद्र मोदींच्या धडाकेबाज कार्यप्रणालीला,
- देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेल्या प्रामाणिक कारभारामुळे लोकांनी विश्वास दाखवला.
- सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले.  
- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे सर्वांचा पराभव झाला.
- केवळ शिवसेना आणि भाजप यांचीच वाढ झाली. त्यातही शिवसेनेची वाढ मोजकी तर भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. 
पुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा सविस्तर बातमी... 
मुंबईत युतीबाबत कोअर कमिटी ठरवेल...
अडीच वर्षांतील कामाची पोचपावती : दानवे...
मुंबई मनपा: आवाज शिवसेनेचाच, भाजपला युतीशिवाय पर्याय नाही

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...