आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: या सौंदर्यवतीचे नाव कसे पडले होते मधुबाला, वाचा हिच्याविषयी बरंच काही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड मधील सौदर्यांची खाण अशी ओळख असलेली अभिनेत्री मधुबाला यांचा आज ( 14 फेब्रुवारी)  वाढदिवस. योगायोग असा की याच दिवशी व्हॅलेंटाइन डे सुद्धा असतो. आपल्या अत्यंत मोहक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मधुबाला यांनी 23 फेब्रुवारी 1969 ला या जगाचा निरोप घेतला. महल, फागुन, हावडा ब्रिज, काला पानी आणि चलती का नाम गाडी यासारखे त्यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.

मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी होते. बाबुराव आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दाम्पत्यांचा त्यांच्यावर फार मोह होता. त्यांनीच मुमताजचे नाव 'मधुबाला' असे ठेवले होते. 1942 मध्ये मधुबालाला बाल कलाकार म्हणून बसंत या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर प्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक केदार शर्मा यांच्या 1947 मध्ये रिलीज झालेल्या नीलकमल या सिनेमातून त्यांना अभिनेत्रीच्या रुपात खरी ओळख मिळाली. मधुबालांनी 66 सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्रीच्या भुमिका साकारल्या आहेत. या दरम्यान त्यांनी देवानंद, दिलीप कुमार, अशोक कुमार या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले. ज्वारा भाटा सिनेमाच्या सेटवर मधुबालांची ओळख दिलीप कुमार यांच्याशी झाली. याच सेटवर त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या. परंतु, दिलीप कुमारांनी त्यांना लग्नास नकार दिला.
 
 
त्यानंतर मधुबाला प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. मधुबालाला ह्रदयरोगाचा आजार होता. 1950 पासुन त्यांच्यावर उपचार सुरु होते. आपले आजारपण त्यांनी सर्वांपासून लपवून ठेवले होते. शेवटी 23 जानेवारी 1969 रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. भारतीय टपाल खात्याने मधुबलांचे तिकीट काढून त्यांना सन्मानित केले होते. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मधुबाला यांचे निवडक फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...