आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्यांच्या सुरक्षेवर जनतेचा पैसा खर्चायची काय गरज? पक्षनिधीतून पैसे देऊ शकतात: हायकोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नेत्यांच्या सुरक्षेवरील खर्चाबद्दल मुंबई हायकोर्टाने बुधवारी अनेक सवाल केले. कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारले, नेतेमंडळींना पोलिस संरक्षण पुरवण्यासाठी करदात्यांचा पैसा खर्चण्याची काय गरज आहे? ते पक्षनिधीतूनही हा खर्च भागवू शकतात. 


खासगी लोकांना पोलिस संरक्षण देण्याची प्रक्रिया अधिक सुयोग्य करण्याचे आदेश सरकारला देत मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्या पीठाने ही टिप्पणी केली. महाराष्ट्र पोलिसांना नेते, िचत्रपट कलाकारांकडून थकबाकी वसुलीचे आदेश द्यावे, अशी मागणी एका वकिलाने जनहित याचिकेद्वारे केली होती. याचिकेनुसार, राज्य पोलिस दलाचे सुमारे १ हजार कर्मचारी खासगी सुरक्षेत तैनात केलेले आहेत. 

 

अंगरक्षक म्हणून...
न्या. चेल्लूर म्हणाल्या, खासगी व्यक्ती वा नेत्यांसोबत अंगरक्षक म्हणून तैनात पाेलिस कर्मचाऱ्यांना सातत्याने या ड्यूटीवर लावू नये. त्यांना ठरावीक वेळेनंतर आपल्या कामावर परतण्याची परवानगी देण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...