आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथ प्रदर्शनात यंदा विक्रमी 350 स्टॉल, व्यवस्थेबाबत प्रकाशकांनी व्यक्त केले समाधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 पु.भा.भावे साहित्यनगरी (डोंबिवली) - 90 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन दुपारी करण्यात आले. साहित्य संमेलनात ग्रंथ प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रंथविक्री होत असते. यंदा तर डोंबिवलीतील साहित्य संमेलनात विक्रमी 350 स्टॉल्स असल्याचे चांगला प्रतिसादही मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रंथ प्रदर्शनाला यंदा रां.ची.ढेरे ग्रंथग्राम असे नाव देण्यात आले आहे. 
 
यंदा ग्रंथ प्रदर्शनामध्ये मौज, पॉप्युलर प्रकाशन अशा मोठ्या प्रकाशकांसह अनेक प्रकाशकांचे स्टॉल्स आहेत. महानुभाव पंथाच्या साहित्याचा स्टॉलही भरपूर मोठा आहे. विशेष म्हणजे, मराठवाडा, विदर्भ अशा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकाशकांचे याठिकाणी स्टॉल आहेत. ग्रंथप्रदर्शनाला सुरुवात झाल्यानंतर हळू हळू वाचक ग्रंथप्रदर्शनाला भेट देत आहेत. पण साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर आज सायंकाळी आणि प्रामुख्याने उद्या आणि परवा मोठ्या संख्येने मराठी साहित्य रसिक ग्रंथप्रदर्शनाला भेट देण्याची शक्यता आहे. 

असेही साहित्य रसिक 
ग्रंथप्रदर्शनामद्ये मेंढपाळाच्या वेशाच एक साहित्यरसिक आल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समजले की ते निवृत्त डीएसपी असून त्यांचे नाव नारायण मोठेदेसाई असे आहे. साहित्याची आवड असल्यामुळे निवृत्तीनंतर जिथे कुठे साहित्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित होतात, त्याठिकाणी जात असल्याचे मोठेदेसाई यांनी सांगितले. पोषाखाबाबत विचारले असता. निवृत्तीनंतर मेंढपाळांसाठी काम करत असल्याने याच वेशात कार्यक्रमात जात असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्रंथप्रदर्शनातील स्टॉल्सचे PHOTO
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...