आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाही घोटाळेबाजास सोडणार नाही, फडणवीस यांचा विरोधकांना इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अटक केल्याच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चाच होऊ शकत नाही,’ असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत विराेधकांची बाेलती बंद केली. ‘भ्रष्टाचार झाला असेल, आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर तपास यंत्रणांनी गप्प बसावे का?’ असा प्रश्न करीत घोटाळे दाबण्यासाठी सभागृहाचा वापर कोणालाही करू दिला जाणार नाही आणि मदतही करणार नाही. एखाद्याच्या विरोधात पुरावे असतील तर घोटाळेबाजांना सोडणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.

भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी अटक केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अाक्रमक विराेधक वारंवार कामकाजात अडथळे अाणत हाेते. भुजबळ प्रकरणावर सभागृहात चर्चा घ्यावी अशी त्यांची मागणी हाेती. मात्र ती मान्य न झाल्याने विराेधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यासमोर शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पाणीटंचाई आदी समस्या असताना विरोधक कोणत्या प्रश्नाला प्राधान्य देत आहेत हे यातून दिसते. आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही. ‘ईडी’ स्वायत्त संस्था असून ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. गेल्या काही महिन्यांपासून हवालामार्गे पैसे पाठवल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू होता. या संस्थेने पुराव्यावरूनच समीर भुजबळ यांना अटक केली. त्याचप्रमाणे सोमवारी छगन भुजबळ यांना कलम १९ (१) नुसार अटक केली. विरोधक तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी सभागृहाचा वापर करीत असतील तर ते योग्य नाही. घोटाळे होत असताना सक्तवसुली संचालनालयाने हातावर हात ठेवून शांत बसावं की कायदेशीर कारवाई करावी? या कारवाईला विरोधक राजकीय कारवाई म्हणत असले तरी नागरिकांना सर्व माहीत आहे, ते सर्व जाणून आहेत,’ असा टाेलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
विरोधकांच्या गोंधळाने परिषद तहकूब
गन भुजबळ यांच्या अटकेचे तीव्र पडसाद मंगळवारी िवधान परिषदेत उमटले. या प्रकरणावर चर्चेची मागणी लावून धरत दाेन्ही कांॅग्रेसच्या अामदारांनी घाेषणाबाजी केली. सभापतींनी कामकाज चालविण्याचा तीन वेळा प्रयत्न केला, मात्र विराेधकांचा गाेंधळ थांबत नव्हता. त्यामुळे सभागृह संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

दुपारी बारा वाजता सभागृह सुरू हाेताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव सादर केला. भुजबळ या सभागृहाचे नेते राहिले आहेत, ते उपमुख्यमंत्रीही होते. गेली २५ वर्षे ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत, अशा नेत्याला अटक करून सरकार िवरोधकांना खच्ची करण्याचा प्रयत्न करत अाहे, असा आरोप मुंडे यांनी केला.

संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी प्रश्नोत्तराच्या पूर्वी स्थगन प्रस्ताव सादर करण्याची, नवी प्रथा िवरोधक पाडत अाहेत, असा आरोप केला. सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर स्थगनप्रश्नी िनर्णय देतो असे सांगत प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेसचे सदस्य सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणा देऊ लागले. त्यामुळे सभापतींनी सर्वप्रथम ३० मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. त्यानंतर ज्या ज्या वेळी कामकाज सुरू झाले तेव्हा विरोधकांचा गोंधळ कायम राहीला. त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावे लागले.
१.राष्ट्रवादीच्या स्थगनच्या मागणीला काँग्रेस सदस्यांनी जोरदार साथ केली. सभापतींच्या आसनासमोर धाव घेत सभागृहाचे कामकाज रोखून धरण्यातही राष्ट्रवादी सदस्यांबरोबर काँग्रेस सदस्यही आघाडीवर राहिले.

२.छगन भुजबळ यांच्या अटकेचा िनषेध म्हणून राष्ट्रवादीचे सर्व सदस्य डाव्या दंडावर काळी पट्टी बांधून सभागृहात आले होते.

३.बहुजनांचा द्वेष करणाऱ्या सरकारचा िधक्कार असो, दादागिरी करणाऱ्या फडणवीस सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत िवरोधी सदस्यांनी तब्बल ६० िमनिटे सभागृहात घोषणाबाजी केली.