आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीमध्ये गणित विषय ऐच्छिक करता येईल का?, मुंबई हायकाेर्टाकडून शिक्षण मंडळांना विचारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गणिताची गरज नसणाऱ्या कला व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून इयत्ता दहावीत गणित हा विषय ऐच्छिक करण्याबाबत विचार करा, अशी सूचना मुंबई हायकोर्टाने सीबीएसईसह शिक्षण मंडळांना केली आहे. याविषयी तज्ज्ञांची मते घेऊन कोर्टाची सूचना अमलात आणली जाऊ शकते का, याचीही चाचपणी करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले.  कमी आकलन शक्तीच्या विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर येणाऱ्या अडचणी व अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने केलेले प्रयत्न या मुद्द्यांवर मानसोपचारतज्ज्ञ हरीश शेट्टी यांनी याचिका दाखल केली होती. 
 
याचिकेत उपस्थित करण्यात आलेले मुद्दे
- याचिकेत विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता आणि अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी बोर्डाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न हे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
- कोर्टाने निरीक्षण नोंदविले की गणितासारख्या विषयात नापास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून देतात.
- न्यायाधीश कानडे म्हणाले, कला आणि अन्य शाखांमधील अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणितासारखे विषय शिकण्याची गरज नसते.
- गणितासारखा विषय एच्छिक केल्यास या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करण्यास मदत मिळेल.

मोजणीत चुक होऊ शकते तर पेपर तपासणीतही होऊ शकते : कोर्ट
- दिल्ली हायकोर्ट सोमवारी म्हणाले की मोजणीत चुक होऊ शकते तर पेपर तपासणीतही चुक होऊ शकते.
- सीबीएससी संदर्भातील याचिकांवर सुनावणी करताना कोर्टाने ही टिप्पणी केली आहे.
- न्यायाधीश संजीव सचदेवा आणि ए. के. चावला म्हणाले की, मोजणीत चुका होऊ शकतात तर पेपर तपासणीतही होऊ शकतात.
 
बातम्या आणखी आहेत...