आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लिपस्टीक..\' चित्रपटाच्या मुद्द्यावर सेंसॉर आणि बॉलीवूड पुन्हा आमने सामने, निहलानींवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लिपस्टीक अंडर माय बुरखा चित्रपटाला सर्टिफिकेट नाकारल्याच्या मुद्द्यावरून हिंदी सिनेसृष्टी आणि सेंसॉर बोर्डामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला आहेत. सेंसॉर बोर्डाने या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. तर सेंसॉर बोर्डाने सर्टिफिकेट देण्याचे काम करावे बंदी घालण्याचे नव्हे अशा प्रतिक्रिया सिनेसृष्टीतून समोर येत आहेत. 

श्याम बेनेगल, सुधीर मिश्रा, नीरज घायवान यांच्यासह अनेकांनी चित्रपटाला सर्टिफिकेट नाकारल्याप्रकरणी सेंसॉर बोर्डावर टीका केली आहे. अलंकृता श्रीवास्तव हिने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रकाश झा यांनी केलेली आहे. चित्रपटात मोठ्या प्रमाणावर आपत्तीजनक भाग असल्याने या चित्रपटाचा सर्टिफिकेट देणे शक्य नसल्याचे सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष पेहलाज निहलानी यांनी म्हटले आहे. यात आक्षेपार्ह भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि आक्षेपार्ह दृश्यांचा भडीमार असल्याचे सेंसॉरचे म्हणणे आहे. पण सेंसॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र द्यावे त्यावर सेंसॉर लावू नये असे श्याम बेनेगल म्हणाले आहेत. चित्रपटाचे प्रदर्शन अशाप्रकारे थांबवता येणार नसल्याचेही ते म्हणाले. 

या चित्रपटात रत्ना पाठक शहा, कोंकणा सेन शर्मा, आहाना कुमरा, प्लबिता बोरठाकूर, सुशांत सिंह, विक्रांत मासे, शशांक अरोरा यांचा महत्त्वाच्या भूमिका आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...