आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी भुजबळांविरुद्ध एक महिन्यात आरोपपत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- निधीचा गैरवापर आणि जमीन बळकावल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्ध महिनाभरात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. एसीबीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. न्या. व्ही. एम. कानडे रेवती मोहिते-डेरे यांच्या न्यायपीठाने भुजबळ कुटुंबीयांविरुद्ध केलेल्या चौकशीचा अहवाल आठवड्यांत सादर करावा, असे निर्देश एसीबी अंमलबजावणी संचलनालयाला दिले. महत्त्वाच्या पदांवरील लोकांविरुद्ध गंभीर आरोप असलेल्या अशा प्रकरणांत देखरेख महत्त्वाची असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.