आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यजनांत निर्माण झालेल्या विश्वासाचा विजय : देवेंद्र फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उत्तर प्रदेशसह विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या  मनात निर्माण केलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.  पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वर्षा निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी  संवाद साधला. अमित शहा यांचे निवडणूक नियोजन व संघटनात्मक रचना याचाही  मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.    

उत्तर प्रदेशात विकासाच्या एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे, असे सांगताना फडणवीस यांनी काँग्रेसवरही भाष्य केले. काँग्रेस हा पक्ष संघटित राहिला नाही. घराणेशाहीचे नेतृत्व मान्य करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय दिसत नाही. ते मान्य केले नाही तर पक्षाचे तुकडे होतात, अशी त्यांची अवस्था आहे, असेही ते म्हणाले.  
 
भाजप कार्यालयात जल्लोष : भाजपला उत्तर प्रदेशात मोठे यश मिळाल्याचा आनंद नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला.
 
मोदींच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा  
उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये मिळालेले यश म्हणजे पंतप्रधान मोदींच्या  नेतृत्वाला जनतेने पुन्हा एकदा भरभक्कम पाठिंबा दिला असून विकासाच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केले. भाजपचा हा विजय नव्हे तर महाविजय आहे, असे मनोगत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केले.  २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर जिंकली होती. त्या वेळी सुरू झालेली भाजपच्या यशाची मालिका चालूच असल्याचे शनिवारच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. जातीपातीचे राजकारण करून विकासाचा मुद्दा मागे ठेवणाऱ्यांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे.    
 
पुढील स्लाईडवर वाचा, कौल राम मंदिराच्या निर्मितीसाठी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...