Home | Maharashtra | Mumbai | news about cinema on soldiers of first world war

पहिल्या महायुद्धातील सैनिकांवर चित्रपट, पुढील वर्षी होणार प्रदर्शित

प्रियांका डहाळे | Update - Jul 12, 2014, 03:50 AM IST

पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी होऊन प्राणाची आहुती देणार्‍या भारतीय सैनिकांच्या जीवनातील तत्कालीन ऐतिहासिक व वैयक्तिक प्रसंगांवर आधारित चित्रपट पॅरिस येथील दिग्दर्शक विजय सिंग तयार करत आहेत. फ्रान्स सरकारच्या पुढाकाराने हा चित्रपट बनवला जात आहे.

  • news about cinema on soldiers of first world war
    मुंबई - पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी होऊन प्राणाची आहुती देणार्‍या भारतीय सैनिकांच्या जीवनातील तत्कालीन ऐतिहासिक व वैयक्तिक प्रसंगांवर आधारित चित्रपट पॅरिस येथील दिग्दर्शक विजय सिंग तयार करत आहेत. फ्रान्स सरकारच्या पुढाकाराने हा चित्रपट बनवला जात आहे.

    ब्रिटिश आर्मीचा एक महत्त्वाचा भाग असलेले 1.4 दशलक्ष भारतीय सैनिक पहिल्या महायुद्धात लढले होते. फ्रेंच अधिकारी व ब्रिटिश अधिकार्‍यांना त्यावेळी भारतीय सैनिकांना अन्नपुरवठा करताना त्यांच्या पारंपरिक प्रथा व नियमांमुळे अनेक अडचणी आल्या होत्या. शिवाय त्या काळात भारतीय सैनिकांच्या वैयक्तिक भावविश्वातील कथाही एक कुतूहलाचाच भाग बनून राहिला होता व अद्यापही आहे. त्यामुळे या सैनिकांवर सिंग यांनी प्रकाश टाकत त्या काळातील त्यांच्या जीवनाचे सगळे पैलू या चित्रपटात दाखवायचे ठरवले आहे. भारतीय सैनिकांच्या फ्रान्समधील युवतींबरोबरच्या प्रेमकथादेखील या चित्रपटात दाखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहेत. सिंग हे स्वत: लेखकदेखील असून या चित्रपटाआधी त्यांच्या ‘जय गंगा’ आणि ‘वन डॉलर करी’ यासारख्या माहितीपटांचीही समीक्षकांनी जागतिक पातळीवर दखल घेतली होती.

    पुढील वर्षी प्रदर्शित
    सैनिकांवरील चित्रपटाचे चित्रीकरण ऑस्ट्रिया, भारत, फ्रान्स आणि बेल्जियम येथे होणार आहे. सलग तीन वर्षे सिंग यांनी या विषयावर संशोधन केले असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पुढील वर्षी पहिल्या महायुद्धास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे भारतीय सैनिकांना हा चित्रपट एक श्रद्धांजली ठरणार आहे.

Trending