आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद, तुळजापूर, हिंगाेली, वैजापूर, पाथरी नगर परिषदांना पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात आतापर्यंत चार लाख शौचालये बनविण्यात आली आहेत. आतापर्यंत दोनशे पन्नास पैकी दोनशे शहरे हागणदारीमुक्त करण्यात आली असून उर्वरित सर्व शहरे तसेच गावे हागणदारी मुक्त करुन यावर्षीच महाराष्ट्र हे देशातील पहिले हागणदारी मुक्त राज्य करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक तो निधी, मदत देण्यात येईल, अशी ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.

पहिल्या नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट नगर परिषदा, सर्वोत्कृष्ट नगर परिषदा तसेच महापालिकांच्या विशेष पुरस्कारांच्या वितरण कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यात मराठवाड्यातील उस्मानाबाद, हिंगाेली, वैजापूर, तुळजापूर, पाथरी या नगर परिषदांच्या प्रशासनाचा  गाैरव करण्यात अाला.
 
विभागनिहाय विजेत्या नगरपरिषदा
 ‘अ’ वर्ग  :  वर्धा, (जि. वर्धा), उस्मानाबाद, अंबरनाथ, (जि. ठाणे). प्रत्येकी चार कोटी रुपयांचा पुरस्कार
 
ब’ वर्ग  :  प्रथम : नागपूर  विभाग :  उमरेड; द्वितीय :  बल्लारपूर, जि. चंद्रपूर; अमरावती विभाग : प्रथम - वाशिम; द्वितीय - उमरखेड, औरंगाबाद विभाग : प्रथम - हिंगोली; द्वितीय  वैजापूर; नाशिक विभाग : प्रथम - शिरपूर वरवाडे, जि. धुळे; द्वितीय - संगमनेर, जि. अहमदनगर;  पुणे विभाग : प्रथम - पंढरपूर, द्वितीय : विटा. या नगर परिषदांना प्रत्येकी तीन कोटींचा पुरस्कार देण्यात अाला.
 
‘क’ वर्ग  : नागपूर विभाग : प्रथम - मौदा नगरपंचायत, जि. नागपूर; द्वितीय : खापा, जि. नागपूर; अमरावती विभाग : प्रथम - शेंदूरजनघाट, जि. अमरावती;  द्वितीय : दारव्हा, जि. यवतमाळ आणि पांढरकवडा, जि. यवतमाळ यांना विभागून; औरंगाबाद विभाग : प्रथम - तुळजापूर, जि. उस्मानाबाद; द्वितीय क्रमांक : पाथरी, जि. परभणी;  नाशिक विभाग : प्रथम - त्र्यंबक, जि. नाशिक; द्वितीय  : देवळाली प्रवरा, जि. नगर या पालिकांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात अाला.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...