आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : ‘ती’चूक टाळण्यासाठी कोहलीशी बोलूनच प्रशिक्षक निवडणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकदा केलेली चूक पुन्हा करायची नाही, कुंबळेच्या निवडीच्या वेळी आम्ही सर्वच प्रशिक्षकांकडून आज ऐकले तेच ऐकले होते. मात्र या वेळी प्रशिक्षकांच्या कल्पना, त्या राबविण्याची त्यांची शैली आणि प्रत्येक प्रशिक्षकाची कार्यपद्धती याबाबतची माहिती कोहलीला प्रत्यक्ष भेटून देणार आहोत. त्यावर त्याचे मत ऐकणार आहोत व त्यानंतरच  प्रशिक्षक कुणाला करायचे, याबाबत आमचे मत देणार आहोत, असे क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुली यांनी मुंबईतील बैठकीनंतर सांगितले.
 
सचिन ‘स्काइप’वरून बैठकीत सहभागी : मुंबईतील बैठकीसाठी क्रिकेट सल्लागार समितीपैकी सौरव गांगुली व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण उपस्थित होते. सध्या इंग्लंडमध्ये असलेल्या सचिन तेंडुलकरने ‘स्काइप’च्या माध्यमाद्वारेच बैठकीतील चर्चेत आणि निवड प्रक्रियेत भाग घेतला होता. सौरव गांगुलीने आज आणखी एक गोष्ट स्पष्ट केली. तो म्हणाला, ‘प्रशिक्षकाचा कालावधी आगामी विश्वचषकापर्यंत म्हणजे २०१९ पर्यंत असणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रशिक्षकाची निवड होईल. त्यामुळे श्रीलंका दौऱ्याआधी घाईगडबडीने प्रशिक्षक न निवडता पूर्ण विचारांती आणि विराट कोहलीला प्रत्येक प्रशिक्षकाच्या कामाच्या पद्धतीचे विश्लेषण सांगून त्यावर त्याची मते ऐकूनच आम्ही निर्णय घेणार आहोत.’
 
लालचंद, शास्त्रींची स्काइपवरून मुलाखत : मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयातील मुलाखतीसाठी प्रत्यक्ष विरेंद्र सेहवागच हजर होता. इंग्लंडमधून लालचंद राजपूत यांनी तर रवी शास्त्री यांनी विंडीजमधून स्काइपच्या माध्यमाद्वारेच मुलाखतीत सहभाग घेतला. प्रशिक्षक निवडीच्या स्पर्धेत अग्रस्थानी असलेल्या रवी शास्त्री यांनी मुलाखत उत्तम झाल्याचे दिव्य मराठीही बोलताना सांगितले. लंडनहून राजपूत यांनीही आपण सारं काही सविस्तरपणे बोलल्याचे सांगितले. रिचर्ड पायबस, टाॅम मुडी यांनीही ‘स्काइप’च्या माध्यमातूनच मुलाखती दिल्या. फिल सायमन्स मुलाखतीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही.
 
२६ जुलैपासून श्रीलंका दाैरा :  येत्या २६ जुलैपासून टीम इंडिया श्रीलंका दाैऱ्यावर जाणार अाहे.  याठिकारी सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यावरही भारतीय क्रिकेट संघ प्रमुख प्रशिक्षकाविनाच जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यात ३ कसोटी, ५ एकदिवसीय व टी-२० सामन्यांचा समावेश आहे.  दौऱ्यापेक्षाही आगामी दोन वर्षांच्या कालावधीचा विचार करणे महत्त्वाचे असल्याचे गांगुलीने सांगितले.
 
काेहलीचे मत जाणणार
प्रशिक्षण पद्धत, त्यासाठीची कामाची पद्धत यावर आम्हाला कोहलीची मते ऐकायची आहेत. कुंबळेची निवड करताना आम्ही ती गोष्ट केली नव्हती. ती चूक पुन्हा न करता या वेळी निवड करायची आहे, असे गांगुलीने पुन्हा एकदा स्पष्ट केले. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संघ काेचविनाच खेळत आहे. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणासाठी काम करत असलेल्या त्याच साहाय्यक प्रशिक्षकांच्या आधारे  संघ खेळेल.
 
निर्णय घाईचा ठरला असता
साेमवारच्या बैठकीतील   निर्णय घेतला असता तर ती घाई ठरली असती. कारण मुलाखतीदरम्यान प्रशिक्षकांनी याच गोष्टी सांगितल्या होत्या, ज्या कुंबळेची निवड करताना सांगितल्या होत्या. त्यामुळे कोहली अमेरिकेहून भारतात परतण्याची आम्ही प्रतीक्षा करू. तो भारतात परतल्यानंतर आम्ही तिघे जण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत.
 
 
बातम्या आणखी आहेत...