आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभर आचारसंहिता, सत्ताधारी-विराेधकांत नाराजी, शिथिल करण्याची विनंती करणार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी राज्यभर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे विकासकामांना खीळ बसत असल्याचे कारण सांगत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात अाली. आचारसंहितेमुळे राज्यातील सर्वच कामे थांबणार अाहेत. ते टाळण्यासाठी फक्त नगरपंचायती व नगरपरिषदांच्या क्षेत्रालाच अाचारसंहितेचे निर्बंध लागू करावेत, अशी मागणी काही मंत्र्यांनी केली. त्यावर राज्य निवडणूक आयोगाला पत्र आचारसंिहता िशथिल करण्याची केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आल्याचे कळतेे. काॅंग्रेसचे नेते नारायण राणे व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही अशीच भूमिका व्यक्त केली.

यापूर्वी संबंिधत पालिका हद्दीतच आचारसंिहता होती. यावेळी प्रथमच एखाद्या जिल्ह्यातील चार पालिकांच्या निवडणुका असताना संपूर्ण िजल्ह्यात आचारसंिहता लावली गेली. त्यामुळे उर्वरित तालुक्यातील िवकासकामे ठप्प होत आहेत. ही आचारसंहिता संबंधित शहरापुरती मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करु, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री िगरीष बापट यांनी सांगितल्याचे समजते. राज्यात एकूण १९२ नगरपरिषदा, २० नगरपंचायतींच्या निवडणुका चार टप्प्यात हाेणार अाहेत. त्यामुळे १७ आॅक्टोबरपासून आचारसंिहता लागू झाली आहे. फडणवीस सरकारचा दोन वर्षाचा कार्यकाळ ३० ऑक्टोबर रोजी पूर्ण हाेत अाहे. निमित्त सरकारच्या कामांची माहिती जनतेत पोचवण्याची जय्यत तयारी सरकारने केली होती. मात्र आचारसंिहतेमुळे ही संधी मिळणार नाही. त्यामुळे काही मंत्र्यांनी व्यथा मांडल्याचे समजते.

कामे ठप्प करण्यात काय हशील : राणे
‘राज्यभर आचारसंिहता लागू करण्याविषयी मी स्वत: निवडणूक आयाेगाशी बोलणार आहे. पूर्वी आचारसंिहता संबंधित शहरातच असायची. तीच पद्धत योग्य होती. सर्व िठकाणची िवकासकामे बंद करण्यात काय हशील?’, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अशीच भूमिका व्यक्त केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...