आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी फिरवली प्रचाराकडे पाठ, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम एकाकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या एकाधिकारशाही आणि मनमानीला कंटाळून कृपाशंकर सिंह, नसीम खान, नारायण राणे आणि गुरुदास कामत या बड्या नेत्यांनी मुंबईत प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संजय निरुपम एकाकी पडले असून मुंबईत काँग्रेसचा सफाया होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
  
संजय निरुपम यांच्या मनमानीबाबत गुरुदास कामत यांनी सर्वप्रथम आवाज उठवला होता. त्यानंतर कृष्णा हेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला झटका दिला. नारायण राणे यांनीही मुंबईत प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते. शनिवारी कृपाशंकर सिंह, नसीम खान, नारायण राणे आणि गुरुदास कामत यांच्यात एक बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत या चारही नेत्यांनी मुंबईत प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.   

तिकीट वाटपासाठी मिलेनियम हॉटेलमध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नसीम खान आणि संजय निरुपम यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. नसीम खान यांनी काँग्रेस पार्टी तुझ्या बापाची नाही, तू तिकीट कसे देत नाही ते पाहतो, या शब्दांत संजय निरुपम यांना सुनावले. या वेळी एकमेकांना यथेच्छ शिव्याही देण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.   

यामुळे मुंबईत काँग्रेसची मोठीच अडचण झाली असून संजय निरुपम यातून कसा मार्ग काढतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...