आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषः सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत कधीही घेणार नाही -फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेकडे केलेल्या कामांबाबत सांगण्यासारखे काहीच नसल्याने त्यांनी प्रचाराचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवला अाहे. मात्र अामच्या सरकारने गेल्या दाेन-अडीच वर्षांत भरीव काम केलेले असल्यामुळे त्या जाेरावरच अाम्ही विकासाचा मुद्दा प्रचारात मांडला व दहाही महापालिकांत अाम्हाला यश नक्की मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केला. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर जे येतील त्यांना साेबत घेऊ; अन्यथा विराेधी बाकावरही बसण्याची अामची तयारी अाहे, मात्र पारदर्शकतेशी तडजाेड करणार नसल्याचे ते म्हणाले.
 
- मुंबईेत तुमची सत्ता येईल का?   
मुख्यमंत्री : निश्चितच. केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील दहाही महापालिकांमध्ये भाजपच पुढे असेल.   

- मुंबई महापालिकेत  सत्तेसाठी शिवसेनेची मदत घेणार का? 
  मुख्यमंत्री : तशी आवश्यकताच भासणार नाही. सगळ्यात मोठा पक्ष आम्हीच असू.  परंतु मदतीची गरज लागलीच तर पारदर्शकतेच्या मुद्द्यावर जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ. अन्यथा तशीच वेळ अाली तर मोठा पक्ष असूनही आम्ही विरोधातही बसायला तयार आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मदत घेण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. 
 
- शिवसेनेसोबत तुम्ही मुंबई मनपातही सत्तेत आहातच ना? तेव्हा पारदर्शकता नव्हती का?   
मुख्यमंत्री : अाजवर अामची स्थिती जेवणातल्या ताटातील चटणीसारखी होती. दिसायला ताटात होतो, पण अाम्हाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. स्थायी समितीत अनेक निविदा अाम्हाला डावलून मंजूर केल्या जात. मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुरू केला आणि म्हणूनच आम्ही पारदर्शकतेचा मुद्दा अाता लावून धरलाय.
 
 मुंबईत २० वर्षांत नालेसफाईवर आठ हजार कोटी रुपये खर्च केले. हा घोटाळा फार मोठा आहे. शिवसेनेकडे केलेली कामे नसल्याने त्यांनी प्रचाराचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवला. नाेटाबंदीमुळे व्यापारी नाराज असल्याचे गृहीत धरून त्यांनी गुजराती समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न चालवला अाहे, परंतु त्यातही शिवसेनेला यश मिळणार नाही. अाजवर मराठी माणसाला नेहमी गृहीत धरण्यात अाले. आम्ही प्रथमच मराठी माणसाला साद घालून ही स्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात यश नक्कीच मिळेल.    
 
- शिवसेना म्हणते २५ वर्षे युतीत सडली, तुम्हाला काय वाटते?   
मुख्यमंत्री : मी फक्त एक आठवण करून देऊ इच्छितो. २०१४ च्या निवडणुकांच्या वेळी त्यांच्या मुखपत्रात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मॅरेथॉन मुलाखत घेतलेली हाेती. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी युतीचा खूप फायदा झाल्याचे म्हटले होते. मात्र तीन वर्षांत युतीत शिवसेना सडली असे का वाटू लागले समजत नाही.   
 
- भाजपने मराठा मोर्चात फूट पाडल्याचा अाराेप हाेतोय?  
मुख्यमंत्री : मराठा समाज स्वतःहून रस्त्यावर आला. कायदा-सुव्यवस्था राखली. कधी स्वतःचे फोटो छापून आणले नाहीत वा प्रचार केला नाही. याचा फायदा घेण्यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न केले; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे निराशेपोटी आमच्यावर आरोप केले जात आहेत. खरे तर हा संपूर्ण मराठा समाजाचा अपमान आहे. या समाजाने भाजपला मतदान करू नये म्हणूनही सोशल मीडियावर खोटे मेसेज पाठवण्यात आले. परंतु मराठा तरुणांना या सर्व बाबी चांगल्या माहिती आहेत.   
 
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेे भाजपची साथ सोडली का?   
मुख्यमंत्री : आम्ही कधीही कोणत्याही पक्षात वा नेत्यांत फूट पाडत नाही. शेतकऱ्यांसाठी लढणारे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे नेते आहेत आणि त्यांची एकी हीच त्यांची ताकद आहे. रागावून राजू शेट्टी यांनी आमची साथ सोडली आहे. ते दोघेही एकत्र राहिले तर त्यांचा आम्हाला उपयोग आहे.   
 
- कांद्याचे दर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना काही मदत करणार का?   
मुख्यमंत्री : हो, खरे आहे. पूर्वी फक्त आपल्या राज्यातच सर्वाधिक कांदा पिकत असे. परंतु आता नऊ राज्यांमध्ये कांदा पिकताे आणि कांद्याचे उत्पादन होत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची माेठी अावक हाेत असते.  मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो, त्यामुळे अाता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्याचा विचार करणे आवश्यक आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि त्यांच्याबाबतीत सकारात्मक विचार करणार आहोत.  
 
- पुण्यातील एक प्रचारसभा अयशस्वी का झाली?   
मुख्यमंत्री : पुण्यातील सभेची मला वेगळीच वेळ सांगितली आणि मतदारांना वेगळी. त्यामुळे पहिली सभा संपवून मी सभास्थळी गेलो. पाच हजार खुर्च्या आणि मोजकी माणसे त्यामुळे मी सभाच रद्द केली. कम्युनिकेशन गॅपमुळे सभा अयशस्वी झाली.  
 
- प्रचारात औकात, संपत्तीवरच जास्त भर देण्यात आला?   
मुख्यमंत्री : नागपूरमध्ये ‘औकात’ हा शब्द चांगल्या अर्थाने वापरतात. ‘अामची अाैकात दाखवताे’ असे मी म्हणालाे हाेताे. किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले नाहीत तर कंपन्यांची नावे सांगून यात कोणत्या शिवसेना नेत्याची भागीदारी आहे ते स्पष्ट करावे, असे म्हटले होते. शिवसेना नेत्यांनी स्वतःची संपत्ती जाहीर करण्याऐवजी आमचे  अमित शहा यांनी संपत्ती जाहीर करावी असे सांगितले. शहा यांनी संपत्ती जाहीर केली, मग आता ते संपत्ती का जाहीर करीत नाहीत?  
 
शिवसेनेकडे केलेल्या कामांबाबत सांगण्यासारखे काहीच नसल्याने त्यांनी प्रचाराचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वळवला अाहे. मात्र अामच्या सरकारने गेल्या दाेन-अडीच वर्षांत भरीव काम केलेले असल्यामुळे त्या जाेरावरच अाम्ही विकासाचा मुद्दा प्रचारात मांडला व दहाही महापालिकांत अाम्हाला यश नक्की मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केला. पाच वर्षे अामच्या सरकारला धाेका नाही, असा पुनरुच्चार करतानाच सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीची मदत कधीही घेणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
-प्रसंगी विराेधी बाकावर बसू, पण ‘पारदर्शकते’च्या बाबतीत कधीच तडजाेड करणार नाही
-राजू शेट्टी-सदाभाऊ हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते एकत्र राहणेच अामच्यासाठी
 
फायद्याचे  
-कांद्याच्या उत्पादनाबाबत विचार करण्याची गरज   
-अांदाेलनाबाबत गैरसमज पसरवून काही लाेकांकडून मराठा समाजाचा अवमान केला जाताेय.

‘एकट्याने नव्हे, सर्वच नेत्यांनी राज्य पिंजून काढले’  
-  राज्यभर तुम्हीच भाजपच्या प्रचाराचा भार पेललात. पक्षातील अन्य नेते त्यासाठी सक्षम नव्हते का?  
मुख्यमंत्री : हा चुकीचा समज आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढले आहे. मी मुंबईत ११ व राज्यभर ६२ सभा घेतल्या.  चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येकी ३० सभा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ५० च्या वर तर पंकजा मुंडे यांनी ४० सभा घेतल्या, मी मुख्यमंत्री असल्याने माझ्या सभा वाहिन्यांवरून दाखवण्यात आल्या आणि त्यांची चर्चा झाली. भाजपच्या सर्व नेत्यांनी सभा घेतल्यानेच आमचा विजय निश्चित आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...